Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : संस्थाचालकांकडून २५ लाखाची खंडणी मागणार्‍या रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारासह दोघांना अटक

Spread the love

औरंगाबाद – माहितीच्या अधिकारात आक्षेपार्ह माहिती न आढळून आल्यामुळे रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने शैक्षणिक संस्थाचालकाला २५ रु. खंडणी मागणार्‍या समाजवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष व रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराला व त्याच्या साथीदाराला बुधवारी दुपारी ३ वा. विद्यानगरातील हनुमान मंदीराजवळ पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्यांच्या ताब्यातून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अमितकुमार अनिलकुमार सिंग (२८) रा.कुंज ता.ओहारी जि.नवादा बिहार हल्ली मु.पडेगाव व प्रशांत वाघरे रा. गंगागोदावरी लाॅन्स बजाज रुग्णालय परिसर औरंगाबाद अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अमितकुमारसिंग याच्यावर बेगमपुरा आणि जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवार त्याने  तो समाजवादी पक्षाचा अल्पसंख्यांक  जिल्हाध्यक्ष असल्याचे लिहिले आहे.

शहरात सुनील  पालवे यांच्या ११ शैक्षणिक संस्था आहेत.त्यातील वंडर गार्टन शाळेबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती. जिल्हापरिषदेने सहा महिन्यांपूर्वीच आरोपी अमित सिंग ला माहिती दिली होती. तरीही अमितसिंग पालवे यांच्याकडे २५ लाख रु. खंडणी मागतच होता. शेवटी पालवेंनी ५ लाख रु. पर्यंत ची तडजोड करंत आरोपी अमितसिंग ला व त्याचा जोडीदार प्रशांत वाघरे या दोघांना विद्यानगरातील मारुती मंदीराजवळ बोलावले. त्या ठिकाणी पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा लावला होता. रु.पाचशे च्या आकाराचे कागदांचे बंडल एका पाकिटात घालून पालवेंनी ते पाकीट आरोपींना देत सापळा लावलेल्या पोलिसांना सुचित करावे. त्या प्रमाणे नाट्यमय घटना घडवत पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे एपीआय घन्नशाम सोनवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी आरोपींना बेड्या ठोकल्या.या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेल्या कारही जप्त करण्यात आल्या आहेत.

वरील कारवाई एपीआय घन्नशाम सोनवणे,पीएसआय रावसाहेब मुळे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे,शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, दिपक जाधव, नितेश जाधव यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!