Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंत्रिमंडळ बैठक : कुठल्याही विकास प्रकल्पाला स्थगिती नाही , भीमा कोरेगाव प्रकरणी माहिती घेतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

भीमा-कोरेगाव प्रकरणातील किरकोळ स्वरुपातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश मागच्या सरकारनेच दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही, हे पाहण्यात येत असल्याचं  स्पष्ट हे स्पष्ट करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , राज्यातील सध्या सुरू असलेल्या आणि बंद असलेल्या प्रकल्पांचा आज आढावा घेण्यात आला आहे. विकासाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थगिती देण्यात आलेली नाही. याउलट हे प्रकल्प वेगाने पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून एकही प्रकल्प बंद होणार नाही.

आज मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका विशेष बैठकीचे  आयोजन केले  होते . या बैठकीत राज्यातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सुमारे चार तास ही बैठक चालली. त्यामुळे या बैठकीत मागच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प बंद करण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी दिवसभर चर्चा होती. मात्र बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मीडियाशी संवाद साधून ही चर्चा फेटाळून लावली. सध्या राज्यात कोणते पायाभूत प्रकल्प सुरू आहे. त्यावर किती आर्थिक बोजा येऊ शकतो याचा आढावा घेण्यात आला. यावेळी हे प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णयही घेण्यात आला. प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आम्ही एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेले प्रकल्प बंद होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आज झालेल्या बैठकीत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच खात्यातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देताना सांगितले कि ,  प्रत्येक विकास प्रकल्प पूर्ण करण्यावर आमचा भर असणार आहे. उलट त्यात आणखी कामे सामावून घेतली जाईल, असं सांगतानाच आरे कारशेड व्यतिरिक्त कोणत्याही कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आज झालेल्या बैठकीला समृद्धी महामार्गाचे वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आणि मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) म्हटले आहे. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे या सुद्धा उपस्थित होत्या. यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्री सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला असून विविध विभागांची माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील प्रकल्पांपासून ते शेतकऱ्यांच्या योजना आणि राज्याच्या आर्थिक स्थितीची माहितीही त्यांनी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात राज्याच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्याने आणि हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने उद्धव ठाकरे संपूर्ण माहिती घेत असल्याचं बोललं जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!