Mumbai Crime : व्हॉटसअॅपवरून व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील वर्तन करणाऱ्यास तातडीने अटक , वडाळा पोलिसांची कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

सोशल मीडियाचा वापर करून अनेक जण महिला आणि मुलींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यापैकी काही महिलाच अशा विकृतीविरुद्ध पोलिसात तक्रारी करण्याचे धाडस करतात असाच एक प्रकार मुंबईत घडला असून व्हॉट्सअॅप कॉल करुन अश्लील वर्तन करणाऱ्या विकृतास वडाळ्यातील अल्पवयीन मुलीने चांगलाच धडा शिकविला. संभाजी हुसेनकर (२६) या विकृतास तरुणींना वारंवार व्हॉटसअॅप कॉल करण्याची सवय जडली. तरुणीने व्हॉटसअॅप कॉल उचलताच अश्लील कृत्य करणाऱ्या संभाजीने आतापर्यंत शेकडो तरुणींना याप्रकारे त्रास दिला आहे. मात्र, वडाळ्यातील अल्पवयीन मुलीने पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवताच त्याचा खेळ संपला.

Advertisements

पोलिसांनी या विषयी अधिक माहिती देताना सांगितले कि , संभाजी एका गॅरेजमध्ये कामाला असून गेल्या वर्षीही  अशाच प्रकारच्या गुन्ह्यात वरळी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तरीही हि विकृती जडलेल्या  संभाजीने त्यानंतरही व्हॉटसअॅप कॉल करण्याचे प्रकार बंद केले नाहीत.  त्याने पुन्हा संभाजीने शनिवारी वडाळ्यातील अल्पवयीन मुलीस सतत व्हॉट्सअॅप कॉल केले. सतत येणाऱ्या कॉलने कंटाळून या मुलीने १६ व्या वेळी आलेला व्हिडिओ कॉल उचलला. संभाजीने लगेचच फोनवरुन अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. ते पाहून मुलीने लगेचच भावाला  ही माहिती दिली. तेव्हा त्याने तातडीने वडाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Advertisements
Advertisements

याबाबतची  तक्रार येताच पोलिसांनी तातडीने कारवाई करुन संभाजीवर कारवाईची तयारी केली. मोबाइल क्रमांकावरुन त्याचा शोध घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी पथकास दिले. उपनिरीक्षक सलगर, सोनवणे, चव्हाण, वाघमोडे आदींच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्यास अटक केली.

आपलं सरकार