honor killing : सोनई तिहेरी हत्या प्रकरणातील सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयात कायम , एकाची पुराव्याअभावी मुक्तता

Advertisements
Advertisements
Spread the love

अहमदनगर येथील सोनई तिहेरी हत्याकांडप्रकरणी सहापैकी पाच आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. तर या हत्याकांडातील दुसरा आरोपी अशोक नवगिरेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१३मध्ये अहमदनगरच्या सोनई गावात हे हत्याकांड घडले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Advertisements

नाशिकच्या सत्र न्यायालयाने २०१८ मध्ये सहा जणांना फाशीची शिक्षा दिली होती. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आज त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले आणि संदीप कुऱ्हे या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून अशोक नवगिरे याची पुराव्याअभावी या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २०१३ मध्ये अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई गावात ऑनर किलिंगची घटना घडली होती. प्रेमप्रकरणातून धुळे जिल्ह्यातील तीन दलित मजूर युवकांची हत्या करून त्यांचे मृतदेहांचे तुकडे करून सेफ्टिक टँकमध्ये टाकण्यात आले होते. खर्डा आणि जवखेड प्रकरणाच्या आधीची ही घटना आहे.

Advertisements
Advertisements

अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील सोनई गावात २०१३मध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं. संदीप राज थनवार (वय २४), राहुल कंडारे (वय २६) आणि सचिन घारू (वय २३) या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. गवत कापायच्या विळ्याने या तिघांच्या शरीरांचे तुकडे करण्यात आले होते. सोनईच्या गणेशवाडी शिवारातील मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या मेहतर समाजातील सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.

आपलं सरकार