हैद्राबादनंतर बिहारमध्येही सामूहिक बलात्कारानंतर पीडितेला गोळ्या घालून ठार केले आणि पेट्रोल टाकून पेटवले….

Advertisements
Advertisements
Spread the love

हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना आता बिहारमधील बक्सरमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे. हैदराबादप्रमाणे बिहारच्या बक्सर जिल्ह्यात एका मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेने हैदराबाद प्रमाणे बिहारही हादरले आहे.

Advertisements

या घटनेबत पोईसांनी सांगितले कि , काही लोकांनी एका तरुणीचे अपहरण केले व त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि  बलात्कारानंतर तिची गोळी झाडून हत्या केली. हे नराधम इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  सोमवारी ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयानी दिली होती. पीडित मुलगी घराच्या बाहेर उभी असताना दोन तीन अज्ञात लोक तिच्यासोबत काही तरी बोलत होते. कुटुंबीयानी हे पाहिले परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु, काही वेळानंतर मुलगी व तिच्यासोबत अज्ञात व्यक्ती न दिसल्याने त्यांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. परंतु, तरीही मुलगी सापडत नसल्याने कुटुंबाने पोलीस स्टेशन गाढले. व झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात रितसर तक्रार नोंदवली.

Advertisements
Advertisements

या दरम्यान, एका अज्ञात नंबरवरून फोन आला. मुलगी आता घरी येणार नाही, असे सांगून अज्ञात व्यक्तीने फोन कट केला. मंगळवारी सकाळी कुकुढा गावाच्या जवळ मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. गावकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला व अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. हॉस्पिटलमध्ये तिचे शवविच्छेदन केल्यानंतर तिची गोळी झाडून हत्या केल्यानंतर तिला पेटवून दिल्याची माहिती समोर आली. मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ओडिशामध्ये पोलिसांनीच केला बलात्कार 

हैदराबाद येथील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना ओडिशामध्ये देखील सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. त्याने इतर सहकाऱ्यांसोबत मिळून  तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. ती आपल्या गावी जात होती. मात्र, चार जणांनी तिला मदत करण्याचे भासवले. त्यातील एकाने आपण पोलीस असल्याचे सांगत तरुणीची फसवणूक केली. त्या नराधमांनी पीडितेला कारमधून पुरी येथील सरकारी निवासस्थानी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, पीडितेच्या हाती पोलीस कॉन्स्टेबलचे पाकीट आणि ओळखपत्र लागले आहे. त्यावरून आरोपीची ओळख पटल्याने  याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

छत्तीसगढमध्येही अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

छत्तीसगढच्या बिलासपूर येथे देखील सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही घटना १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडली आहे. दोन नराधमांनी मिळून हे कृत्य केले असून पीडितेला त्यांनी मारहाण केल्याची देखील घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपार सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

 

आपलं सरकार