Aurangabad Crime : गुटखा पुडी खाण्यासाठी पैसे न दिल्याने व्यापा-याला मारहाण करून लुटले

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : गुटखा पुडी खान्यासाठी पैसे न दिल्याने दुचाकीवरुन घरी जाणा-या एका व्यापा-याला दोघांनी बेदम मारहाण करुन त्याच्या कडील मोबाईल, सोन साखळी व चांदीचे ब्रासलेट असा सुमारे २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावून नेला. ही घटना २९ नोव्हेंबर रोजी मुकुंदवाडी परिसरातील शिवशाही नगराजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार ब्रम्हदेव विश्वकर्मा (वय २१, रा. शिवशाही नगर, मुकुंदवाडी रेल्वे स्थानका जवळ) यांचे स्लाईडींग विडोंचे दुकान आहे. २९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन दुचाकीवर घरी जात होते. शिवशाही नगर येथील मोकळ्या मैदानाजवळ विश्वकर्मा यांना फोन आला. त्यामुळे ते गाडी थांबवून  फोनवर बोलत उभे होते. त्याचवेळी, एका दुचाकीवर २० ते २५ वर्षीय दोन तरुण तेथे आले. त्यातील एकाने विश्वकर्मा यांना पुडी खाण्यासाठी १० रुपयांची मागणी केली.
राजकुमार विश्वकर्मा यांनी नकार देताच दोघांनी विश्वकर्मा यांना हातचापटाने व बेल्टने मारहाण करुन त्यांच्या खिशातीाल मोबाईल व चांदीचे ब्रासलेट व गळ्यातील अर्धी सोन्याची चैन असा एवूâण २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी हिसकावुन नेला. याप्रकरणी राजकुमार विश्वकर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करीत लुटणा-या दोघांविरूध्द मुकुंदवाडी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कौतिक गोरे करीत आहेत.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार