Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : चौघांनी वकिलाला लुटले उस्मानपुरा पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या

Spread the love

वकिलाला कारमधून बाहेर खेचत विनाकारण मारहाण करुन लुटल्याची घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास छोटा मुरलीधरनगरातील अण्णाभाऊ साठे चौकात घडली. यावेळी लुटारुंनी पंधरा हजारांची रोकड, दोन एटीएम, आधार, मतदान कार्ड आणि वाहन परवाना लुटून नेला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी सोमवारी रात्री तिघांना अटक केली. त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू असल्याचे सहायक फौजदार कल्याण शेळके यांनी सांगितले.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे वकिल किरण प्रकाश राजपुत (२८, रा. कमलनयन बजाज हॉस्पीटलसमोर, सातारा परिसर) हे रविवारी रात्री जय टॉवरकडे कारने (एमएच-२०-एएम-७०००) छोटी मुरलीधरनगर मार्गे जात होते. यावेळी अण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या कारसमोर चार जण आले. त्यांनी कार थांबवून तू कुठे चालला असे म्हणाले. त्यांना राजपुत यांनी काय झाले असे विचारताच त्यांनी कारचा दरवाजा बळजबरी उघडला. याचवेळी काही कारण नसताना एकाने त्यांच्या कानशिलात लाखावली. तेव्हा का मारहाण करता विचारत असतानाच एकाने पंधरा हजार रुपये असलेले कारमधील पाकिट, दोन एटीएम कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड व वाहन परवाना लांबविला. हा वाद सुरू असताना परिसरातील नागरिकांनी चौघांच्या तावडीतून राजपुत यांची सुटका केली. त्यानंतर राजपूत  यांनी उस्मानपुरा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. दरम्यान, उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक फौजदार कल्याण शेळके व त्यांच्या पथकाने तिघांना अटक केली आहे.

या प्रकरणात उस्मानपुरा पोलिसांनी गु.र.न. l-233/19 act 392,34  अन्वये  1) आनंद देविदास गवळी वय ३१, २) सुरेश कैलास भालके वय २३, ३) अनिल बंडु कांबळे वय १९, तिघे राहणार कबीर नगर, उस्मानपुरा, औरंगाबाद यांना सदर गुन्ह्यात अटक केली.  पोलीस निरीक्षक तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. कल्याण शेळके, पोहेका ठोंबरे पोकॉ संतोष सिरसाठ, सतीश जाधव, संजय सिंग डोभाळ अधिक तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!