Aurangabad Crime : पोलिसांना कोर्टाचा दणका , अखेर दोन डाॅक्टरांसहित तिघांवर गर्भपाताचा गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – दोन डाॅक्टरांसहित तिघांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कोर्टाच्या आदेशाने गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फेब्रू २०१९ मधे बिडकीन येथील रहिवासी सोनाली किशोर भुजबळ(२०) हिचा गर्भपात केला. या प्रकरणात तिचा पती किशोर सौपान भुजबळ(२५) सासू लीला भूजबळ(५५) सासरा सौपान भुजबळ(६०)सर्व रा. पान रांजणगाव यांनी वाळूज औद्योगिक परिसरातील डाॅ.मोरे आणि अमरप्रित चौकातील सरोज हाॅस्पिटल चे डाॅ. राठी यांच्या मदतीने सप्टेंबर महिन्यात गर्भपात केला होता.

Advertisements

दरम्यान पोलिसांनी न्यायालयाच्या दणक्याने गुन्हा दाखल केला खरा पण ज्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यांची  पूर्ण नावे पोलिसांकडून सांगण्यात आली नाही , हे उल्लेखनीय !!

Advertisements
Advertisements

या प्रकरणी सोनाली ने क्रांतीचौक पोलिसांकडे तक्रार दिली होती.पण पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे सोनाली भुजबळ ने कोर्टाकडूनवरील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणले. कोर्टाच्या आदेशावरुन वरील पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. डाॅक्टरांवर अटकेची कारवाई करण्यापूर्वी घाटी रुग्णालयातील अधिष्ठातांचा सल्ला घेणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले.पुढील तपास पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या निगराणीखाली पोलिस निरीक्षक उत्तम मुळक व पीएसआय गजानन सोनटक्के करीत  आहेत.

आपलं सरकार