Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : चेक बाऊन्स प्रकरणातील आरोपी बारा वर्षांनी अटक, गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Spread the love

चेक बाऊन्स प्रकरणात बारा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण बाळासाहेब काळे (५१, मुळ रा. ताजनापुर, ता. खुलताबाद) असे त्याचे नाव आहे. त्याने एमआयडीसी चिकलठाणा कंपनीतील एका वॉचमनला ५० हजारांना गंडविले आहे. तो १९९८ पासून फरार झाला होता.

एमआयडीसी चिकलठाणा येथील श्री एंटरप्राईजेस कंपनीत शिवराम गंगाराम कोरकने (३५, रा. नारेगाव) हे वॉचमन म्हणून कामाला होते. कोरकने यांनी १२ जानेवारी १९९८ रोजी प्रविण काळे याची मिनीडोअर रिक्षा (एमएच-२०-ए-७७५४) एक लाख १६ हजारात खरेदी केली होती. हा व्यवहार काळेच्या हडको, एन-९ मधील घरी करण्यात आला होता. यावेळी पन्नास हजार रुपये रोख व उर्वरीत ५६ हजारांची रोकड फायनान्स कंपनीचे कर्ज काढून देणार व त्याचे हप्ते कोरकने फेडणार असले ठरले होते. त्यानंतर २२ जानेवारी १९९८ रोजी काळे त्यांना भेटला. त्याने आपल्याला रिक्षा विकायची नाही. आता रिक्षा परत करा, तुमचे पैसे परत करतो. असे म्हणून त्याने स्टेट बँक आॅफ महाराष्ट्राच्या बाजार सावंगी शाखेचे प्रत्येकी २८ हजारांचे दोन आणि एक नऊ हजारांचा चेक कोरकने यांना दिले. सुरुवातीला नऊ हजारांचा चेक १६ मार्च १९९८ रोजी कोरकने यांनी बँकेत वटविण्यासाठी टाकला. मात्र, काळेच्या खात्यात रक्कम नसल्याने तो परत आला. खात्यात पैसे नसल्याने उर्वरीत दोन चेक कोरकने यांनी बँकेत वटविण्यासाठी टाकले नाही. त्यांनी थेट काळेची भेट घेऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पण नेहमी त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कोरकने यांनी सिडको पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर काळे फरार झाला होता. दरम्यान, त्याच्याबाबत माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार सय्यद मुजीब अली, पोलिस नाईक गजानन मांटे, भावसिंग चव्हाण यांनी पकडले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!