महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी केवळ शासन -प्रशासनाचीच नाही तर सर्वांचीच : मोहन भागवत

Advertisements
Advertisements
Spread the love

महिलांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनावर अवलंबून राहण्यापेक्षा घरातील पुरुषांना महिलांसोबत कशी वर्तवणूक असावी याचे शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार व पीडित मुलीच्या हत्येच्या घटनेनेवर भाष्य करताना भागवत बोलत होते.

Advertisements

दिल्लीतील ‘गीता महोत्सव’ कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. महिलांच्या सुरक्षितेसाठी सरकारने कायदे केले आहेत, त्याचे पालन झाले पाहिजे. प्रशासनावर कायमच अवलंबून राहता कामा नये. पुरुषांनी महिलांसोबत कसे वागावे, याचे शिक्षण द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले.

Advertisements
Advertisements

महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना आई-बहिणी असतात. महिलांमुळे त्यांचे अस्तित्व आहे. मात्र, या आरोपींना महिलांसोबत कसे वागावे हेच शिकवले नसेल असा घणाघात भागवत यांनी केला. पुरुषांना महिला प्रति, मातृशक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन शुद्ध, स्वच्छ असायला हवा, पुरुषांना महिलांसोबत योग्य वागण्याचे शिक्षण दिले तर महिला अत्याचारांवर आळा घालता येईल असेही त्यांनी म्हटले.

आपलं सरकार