” मी पुन्हा येईन…” चे उत्तर देताना नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

Advertisements
Advertisements
Spread the love

आपल्यावरील अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना फडणवीस यांनी सभागृहात जोरदार भाषण केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. फडणवीस उद्धव यांच्याबद्दल म्हणाले की प्रेमाचे, जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध राजकारणापलिकडे असतात. ‘जनतेकडून त्यांच्या मनात ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत; तसेच मुख्यमंत्र्यांच्याही महाराष्ट्राच्या विकासासाठी काही योजना असतील, त्या सर्वांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू,’ असे ते म्हणाले.

Advertisements

‘मी पुन्हा येईन म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा…’ अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील टीकेला आज सभागृहात उत्तर दिले. ‘मेरा पानी उतरता देख,  मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी देवेंद्र यांनी म्हटल्या आणि सभागृहात बाके वाजवून सर्वांनी त्यांना दाद दिली. ‘लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे १२० टक्क्यांनी मेरिटमध्ये आले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या सरकारच्या आघाडीची आकडेमोड केली.

Advertisements
Advertisements

‘मी कधी नियमाच्या बाहेर गेलो नाही. कालदेखील सभागृहात मी माझे मुद्दे संविधानातील चौकटीनुसारच मांडले होते. अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो, पण आम्ही समाधानी नव्हतो, म्हणून सभागृहाबाहेर गेलो. नियमाचं पुस्तक आणि संविधानापलिकडे जाऊन मी कोणताही मुद्दा मांडणार नाही, ही ग्वाही मी देतो. कुठल्याही महापुरुषाचं नाव घेण्याकरिता कुणाचीही मनाई नाही. तुम्ही सकाळ, संध्याकाळ कितीही वेळा यांचं नाव घ्या, पण संविधानातील तरतुदीनुसार, संविधानाने आखून दिलेल्या आराखड्यानुसार शपथ घेणे आवश्यक होते, इतकंच आमचं म्हणणं होतं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही पुन्हा शपथ घ्यावी लागली होती,’ असे फडणवीस यांनी भाजपने शनिवारी नव्या सरकारवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल स्पष्ट केले.

‘सभागृह नियमानुसार चालायला हवं हीच माझी जबाबदारी आहे. संविधानाने इतकी मोठी शक्ती देशाला दिली आहे की कोणतीही समस्या या संविधानाच्या माध्यमातून सोडवता येते. विधीमंडळाची रचनाही त्या संविधानानुसार केली आहे. येथील विरोधी पक्ष हा शत्रू नाही तर वैचारिक विरोधाकरिता आपण एकमेकांसमोर बसलो आहोत. लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात.

आपलं सरकार