Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अर्थकारण : देशात अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक , जिडीपीच्या दारात मोठी घसरण, मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली चिंता

Spread the love

देशात अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून  जिडीपीच्या दारात मोठी घसरणन झाली असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार देशाचा आर्थिक विकास दर ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे देश आर्थिक मंदीच्या सावटाखालीच असून देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे .

याअगोदर सहा वर्षांपूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे २०१९-२० सालाच्या सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत ०.५ टक्क्यांनी विकासदर खाली घसरला आहे. विशेष म्हणजे विकास दरात घसरण होणारी सहावी तिमाही आहे. आर्थिक वर्ष २०१८-२०१९ आणि २०१९-२०१९ चा विचार केला तर पहिल्या तिमाहीत विकास दर हा ८ टक्क्यांवर होता. त्यानंतर दुसऱ्या तिमाहीत तो ७ टक्क्यांवर आला. तिसऱ्या तिमाहीत ६.६ टक्के, चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के, पाचव्या तिमाहीत ५ टक्के आणि आणि त्यानंतर सहाव्या तिमाहीत ४.५ टक्क्यांवर विकास दर घसरला.

आर्थिक वर्ष २०१९ च्या तिमाहीत बांधकाम क्षेत्रात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन १ टक्का, सर्व्हिस सेक्टर ७.३ टक्क्यांवरुन ६.८ टक्क्यांपर्यंत तर मायनिंगमध्ये ०.१ टक्क्यांवर घट झाली आहे. दरम्यान, देशात विकासाचा वेग कमी झाला असला तरी मंदीचा कुठलाही धोका नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन राज्यसभेत म्हणाल्या आहेत.

मनोहनसिंग यांनी  चिंता 

दरम्यान जीडीपीच्या ताज्या आकड्यांवर अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेची परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक असल्याचं ते म्हणाले. अर्थव्यवस्थेतील चिंता हेच अस्थिरतेचं मुलभूत कारण आहे. जीडीपीचे ताजे आकडे अनपेक्षित आहेत, असं त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. ‘जीडीपीची आकडेवारी ही ४.५ टक्के आहे. हे बिलकूल मान्य नाही. आपल्या देशाची वर्षाला ८ ते ९ टक्क्यांच्या वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे,’ असं सांगत, आर्थिक धोरणांमध्ये बदल करुन अर्थव्यवस्था सुधारणार नाही, असंही मनमोहन सिंह यांनी सांगितलं.

समाजातलं सध्याचं वातावरण बदलण्याची गरज मनमोहन सिंह यांनी बोलून दाखवली. ‘आपली अर्थव्यवस्था ८ टक्क्यांच्या वेगाने वाढवायची असेल, तर या भीतीचं रुपांतर आत्मविश्वासामध्ये झालं पाहिजे. अर्थव्यवस्थेची स्थिती ही समाजातील स्थितीचं प्रतिबिंब आहे. आपला विश्वास आणि आत्मविश्वासच आता ढासळलेला आहे,’ असं मत मनमोहन सिंह यांनी व्यक्त केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!