Aurangabad Crime : बनावट जामिनदार रॅकेट , आझाद मैदान पोलिस ठाण्यात अटकेतल्या चौघांविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – बनावट जामिनदार रॅकेट प्रकरणी अयुबखान रमजानखान , मुश्ताक, वसीम अहमदखान शमीम अहमद,शेख जहाॅगिर शेख आलमगिर या हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींवर शुक्रवारी औरंगाबाद गुन्हेशाखेच्या तक्रारी वरुन किल्ला कोर्टाच्या आदेशावरुन आझादमैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Advertisements

गेल्या ३१मे रोजी आयकर प्रकरणातील गुन्ह्यात पुरोहित नावाच्या आरोपीन नालासोपार्‍याच्या वसीम अहमदखान याच्या ओळखीने मुश्ताक कडून जामिन मिळवून दिला.सध्या वसीम अहमदखान हा हर्सूल कारागृहात शिक्षा भोगंत आहे. मुश्ताक आणि त्याच्या टोळक्याला बनावट जामिनदार रॅकेट प्रकरणात ६नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर या आरोपींजवळ बरेच आधारकार्ड सापडले होते. तब्बल दोन आठवडे या आधारकार्डांचा अभ्यास केल्यानंतर त्यामधे पुण्यातील ट्रक चोर जाकेर चेही आधारकार्ड सापडले.

Advertisements
Advertisements

जाकेरचे आधारकार्ड वापरुन मुश्ताक आणि वसीम अहमदखान व अन्य दोघांनी पुरोहित या आरोपीचा जामीन करवून दिल्याचे तपासात उघंड झाले होते. त्यानुसार मुंबईच्या किल्ला कोर्टाशी पत्रव्यवहार करीत  गुन्हेशाखेने पुरोहित नावाच्या आरोपीचा जामिन झाल्याबद्दलचे तपशील कळवले व आझाद मैदान पोलिस ठाण्यात हर्सूल कारागृहात अटक असलेल्या चार आरोपींविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल होण्याची विनंती केली. त्या विनंती अर्जावरुन किल्ला कोर्टाने औरंगाबाद गुन्हेशाखेलाच फिर्याद देण्याचे आदेश दिले. त्यानुसार पीएसआय अमोल देशमुख यांच्या फिर्यादीवरुन आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत करंत आहेत.

 

आपलं सरकार