Aurangabad Crime : दुचाकी विकणारे दोघे अटकेत, बारा तासात नऊ दुचाकी जप्त, सीसी टिव्हीच्या मदतीने बेगमपुरा पोलिसांची कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

फोटो :  कय्युम खान

Advertisements

वेगवेगळ्या जिल्ह््यातील मित्रांच्या मदतीने महागड्या दुचाकी चोरुन त्यांची कवडीमोल किंमतीत विक्री करणा-या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे. या दोघांकडून अहमदनगर जिल्ह््यातील खेडेगावात लपवून ठेवलेल्या नऊ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. विशेष म्हणजे दुचाकी चोरीचे सत्र मध्यरात्री सुरू असायचे. चोरलेली दुचाकी दहा ते पंधरा हजारात विकली जात होती. सीसी टिव्ही कॅमेरात कैद झाल्याने ही टोळी बेगमपुरा पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीकडून आणखी दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले आहे.

Advertisements
Advertisements

गेल्या वर्षभरापासून दुचाकी चोरांनी शहरात धुमाकूळ घातलेला आहे. यापुर्वी सिडको, पुंडलिकनगर पोलिसांनी दुचाकी चोरांची मोठी टोळी जेरबंद केली होती. तरी देखील दुचाकी चोरींचे प्रमाण वाढतच आहे. अशातच मोहम्मद कैसरोद्दीन नसिरोद्दीन सिद्दीकी (५२, रा. आसेफिया कॉलनी, जयभीमनगर, बेगमपुरा) यांची १८ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास बुलेट (एमएच-२०-ईव्ही-७२०८) चोरीला गेली होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय इतर दुचाकी देखील बेगमपुरा भागातून चोरीला गेल्या होत्या. बेगमपुरा पोलिसांनी दुचाकी चोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसी टिव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा एकच टोळी यामागे असल्याचे समोर आले होते. त्या फुटेजच्या आधारे बेगमपुरा पोलिसांनी टोळीचा माग काढायला सुरूवात केली. त्यावेळी शहरातील किराडपुरा भागात शेख शाहरुख शेख रहिम (२२, मुळ रा. पाचपिरचावडी, अहमदनगर) याचा मुख्य सहभाग असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेत खाक्या दाखवला. त्याने साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरुन त्याचा साथीदार कृष्णा बाबासाहेब गुंड (२३, रा. आरणगाव, अहमदनगर) याला ताब्यात घेण्यात आले. या दोघांकडून अवघ्या बारा तासात बुलेट, दुचाकी अशा नऊ गाड्या हस्तगत केल्या.
……..
अशी करायचे चोरी…..
शेख शाहरुख हा गेल्या एक महिन्यापासून किराडपुरा भागात किरायाने खोली घेऊन राहत होता. त्याचे जालना, नेवासा, चाळीसगाव व नगर या गावात साथीदार आहेत. दुचाकी चोरण्यासाठी दिवसभर रेकी करुन तो साथीदारांना शहरात बोलावून घ्यायचा. मध्यरात्री दिड ते तीनच्या सुमारास शेख शाहरुख व त्याचे साथीदार घरासमोर उभी असलेली दुचाकी ढकलत दुरपर्यंत आणायचे. त्यानंतर हँडल लॉक व बनावट चावीच्या सहाय्याने दुचाकीचे लॉक उघडायचे. यावेळी ज्या गावातून साथीदार आलेला आहे. तो साथीदार दुचाकी घेऊन पसार व्हायचा. पुढे ही चोरलेली दुचाकी परिसरातील नागरिकाला अवघ्या दहा ते पंधरा हजारात विकायचे. या टोळीने छावणी, जिन्सी, सातारा आणि क्रांतीचौक या भागातून देखील दुचाकी चोरल्याचे सांगितले आहे.
……..
तीन ते चार सीसी टिव्हीत कैद……
बेगमपुरा भागातून दुचाकी चोरी करत असताना शेख शाहरुख, कृष्णा गुंड, चाळीसगावातील मंजूर असे तिघे तीन ते चारवेळा वेगवेगळ्या सीसी टिव्हीत कैद झाले होते. त्यांनी सरकारी वकिल काझी यांची देखील दुचाकी चोरुन नेली होती. सीसी टिव्ही फुटेज हस्तगत करुन पोलिसांनी अखेर दोघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, शेख शाहरुख याच्याविरुध्द अहमदनगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात जबरी चोरी आणि चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक प्रमोद देवकते, पोलिस नाईक शेख हैदर, रामधन उटाडे, शरद नजन, नामदेव सानप, नागेश पांडे आणि ज्ञानेश्वर ठाकुर यांनी केली.

आपलं सरकार