Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : वृध्देचे मंगळसूत्र हिसकावले, चार दिवसात दुसरी घटना

Spread the love

औषधी आणण्यासाठी पायी जात असलेल्या वृध्देचे दोन दुचाकीस्वारांनी दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना घडली आहे. सोमवारी जवाहरनगर भागातील जय विश्वभारती कॉलनीतील महिलेला पत्ता विचारण्याचा बहाणा करुन दुचाकीवरील दोघांनी मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती.

सिडको, एन-६ भागातील अंजली अष्टीकर (६२, रा. साईनगर) या गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास औषधी आणण्यासाठी पायी जात होत्या. यावेळी घरापासून काही अंतरावर असताना दुचाकीस्वार चोर त्यांच्या समोरुन पुढे गेले. त्यानंतर पुन्हा त्यांच्याजवळ येऊन दुचाकीवर मागे बसलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावत पळ काढला. या घटनेनंतर सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत.

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून , तरुणावर ब्लेडने वार
औरंगाबाद : दारु पिण्यासाठी वीस रुपये दिले नाही, म्हणून एकाने तरुणावर ब्लेडने वार केले. हा प्रकार गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाशेजारी घडला. विराज विजय मोकळे (२०, रा. एन-६, संभाजी कॉलनी, ई-सेक्टर, सिडको) हा गिटार क्लासच्या नोटस घेऊन दुचाकीने घराकडे जात होता. यावेळी श्रीकांत शिखरे (रा. मयूर पार्क) याने त्याच्याकडे दारु पिण्यासाठी वीस रुपयांची मागणी केली. विराजने नकार देताच त्याने ब्लेडने त्याच्या डाव्या गालावर वार केला. त्यावरुन विराजने सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुभाष कानकाटे करत आहेत.

बुरखाधारी महिलेने पर्समधुन ४५ हजार रूपये लांबविले
औरंंंगाबाद : सिटीचौक परिसरातील ज्वेलर्सच्या दुकानात ऑर्डर दिलेल्या सोन्याच्या दागीन्यांचे पैसे देण्यासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधुन बुरखाधारी महिलेने ४५ हजार ५०० रूपये हातोहात लंपास केले. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सराफा बाजारातील विश्वास ज्वेलर्स येथे घडली.
तक्रारदार महिलेने विश्वास ज्वेलर्स येथे सोन्याचे दागीने बनविण्यासाठी ऑर्डर दिली होती. ऑर्डर दिलेल्या दागीन्यांचे पैसे देण्यासाठी तक्रारदार महिला गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विश्वास ज्वेलर्स येथे आली होती. त्यावेळी दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेत एका बुरखाधारी महिलेने तक्रारदार महिलेच्या पर्सची चैन उघडून त्यातून ४५ हजार ५०० रूपये हातचलाखीने चोरून नेले. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
याप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बुरखाधारी महिलेविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार शेख हमीद करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!