Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाविकास आघाडी शपथविधी सोहळा Live News Update : ‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की…’ सहा मंत्र्यांनी घेतली शपथ

Spread the love

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरोबर ६ वाजून ४५ मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ईश्वर साक्ष ठेवून आणि संविधानला स्मरून त्यांनी शपथ घेताच शिवतीर्थावर एकच जल्लोष करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्राला विधानसभेच्या निकालाच्या ३६ दिवसानंतर मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरे शपथविधीनंतर जनतेसमोर नतमस्तक झाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेस : नितीन राऊत 

काँग्रेस : बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 

राष्ट्रवादी काँग्रेस : छगन भुजबळ 

राष्ट्रवादी काँग्रेस : जयंत कुसुम राजाराम पाटील 

शिवसेना : सुभाष देसाई यांनी घेतली शपथ 

शिवसेना : एकनाथ शिंदे यांनी घेतली शपथ 

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो की…’

राज्यपाल भगतसिंग कोसयारी यांचे आगमन 

उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवतीर्थावर आगमन , स्वागत

द्रमुक नेते स्टालिन, टी. आर. बालू, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते अहमद पटेल व्यासपीठावर उपस्थित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यासपीठावर उपस्थित

महाविकास आघाडी सरकार कॅबिनेटची बैठक रात्री आठ वाजता

मातोश्रीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थाकडे रवाना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर,  तब्ब्ल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात आज नव्याने तयार करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे मुंबईतील दादरच्या शिवतीर्थावर शपथ घेत आहेत . या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक निमंत्रित पाहुणे कार्यक्रमस्थळी पोहोचत आहेत.  या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे सोनिया गांधींनाही निमंत्रण देण्यात आले होते परंतु  त्या या सोहळ्याला हजर राहू शकणार नाहीत. त्यांनी पत्र पाठवून या संदर्भातली माहिती दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

काय म्हटलं आहे पत्रात?

प्रिय उद्धवजी,

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी माझी भेट घेतली आणि तुमच्या शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रण दिलं. मुंबईत येणाऱ्या या सोहळ्याला मी येऊ शकत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष अशावेळी एकत्र आले आहेत ज्यावेळी भाजपा दहशत पसरवत आहे. सध्याची देशातली राजकीय स्थितीही चांगली नाही. अर्थव्यवस्था कोसळली आहे. शेतकऱ्यांना या सगळ्याचा मोठा फटका बसला आहे. मात्र महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रात चांगला कारभार चालेल याची मला खात्री आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं आहे. लोकांनीही महाविकास आघाडी स्वीकारली आहे. लोक आपल्याला साथ देतील असाही विश्वास मला वाटतो. आपल्या सगळ्यांचे प्रयत्न जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहात याचा आनंद आहे. त्यासाठी शुभेच्छा!

सोनिया गांधी

अध्यक्षा, काँग्रेस

हे पत्र पाठवून त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच सक्षम सरकार चालवा असंही आवाहन केलं आहे आणि भाजपावर निशाणाही साधला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!