महाराष्ट्राचे सत्ताकारण : महाविकास आघाडीचा समृद्ध आणि प्रगतीशील सरकारचा दावा, राज्य घटनेचे प्रास्तविक हा आमचा अजेंडा…

Advertisements
Advertisements
Spread the love

अनेक बैठका आणि चर्चेनंतर महाराष्ट्रात आजपासून महाविकास आघाडीचे नवे सरकार स्थापन होत असून शिवसेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपला किमान समान कार्यक्रम काय असेल ? याची माहिती पतर्कार परिषदेत दिली. या नव्या आघाडी संदर्भात बोलताना हे नेते म्हणाले कि , समृद्ध आणि प्रगतीशील महाराष्ट्र साकारण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाराष्ट्र विकास आघाडी आकाराला आली आहे. धर्म निरपेक्षतेच्या मूळ सूत्राबरोबरच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नोकऱ्यांमध्ये ८० टक्के भूमिपुत्रांना संधी मिळावी म्हणून कायदा आणि १० रुपयांत थाळी हे या किमान समान कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात आले.

Advertisements

महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करीत  किमान समान कार्यक्रम घोषित केला.

Advertisements
Advertisements

आज रात्री शिवतीर्थावर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्या आधी काही तास आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्याने त्यांनी तीनही पक्षांच्या जाहीरनाम्यातले काही मुद्दे एकत्र करत हा किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. उद्धव ठाकरे सरकारचा तो मुख्य अजेंडा राहणार असून  हे सरकार सर्वांच्या विकासासाठी काम करेल असेही या नेत्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणार असून  शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघू मध्यम आणि मोटे उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यावर सरकारचा अधिक भर असेल. सर्व प्रादेशिक विभागांचा सामान विकास , अनुसूचित जाती जमाती , भटके विमुक्त , इतर मागासवर्गीय, सर्व धर्म आणि अल्पसंख्यांक सामाजिक गट यांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही यायावेळी देण्यात आली.


किमान समान कार्यक्रमातले मुख्य मुद्दे

कर्ज आणि दुष्काळाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना  कर्जमाफी. । शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी मदत . । शेतकऱ्यांना तातडीने विमा मिळवून . । कृषीमालाच्या योग्य भाव देण्याची हमी । गरिबांना शिक्षणा साठी 0% व्याजाने ने कर्ज . । रोजगारामध्ये स्थानिकांना 80 टक्के प्राधान्य.। मुलींना मोफत शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य. । सामान्य नागरिकांसाठी 10 रुपयांमध्ये थाळी. । 500 फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सुट. । दुष्काळासाठी दीर्घकालीन उपययोजना . सर्व कार्यक्रम घटनेतल्या तत्वांना आणि धर्मनिरपेक्षतेला धरून असेल.


राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, राज्याला एक स्थिर सरकार देऊ असा विश्वास देखील यावेळी  व्यक्त करण्यात आला. ही आघाडी या देशातील राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचे प्रतिबिंब असेल असे यावेळी सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेत आपलय पक्षाची भूमिका मांडताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातला प्रत्येक निर्णय हा घटनेच्या प्रास्ताविकाला धरून असेल,  आघाडीच्या प्रत्येक निर्णयात भारतीय संविधानाने सांगितलेले मूल्य आणि तत्व केंद्रस्थानी असतील, या आघाडीचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेऊन, महाविकासआघाडीचे निर्णय समाजातील सर्व घटकांसाठी समान असणार आहेत. यामध्ये भाषा, जात, धर्म असा कुठलाही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही.

राज्यात वाढलेली बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची सुरू असलेली घसरण यामुळे जनतेत जो काही अंसतोष आहे. हे पाहता महाविकासआघाडी राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. ही आघाडी या देशातील राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचे प्रतिबिंब असेल. कोणालाही भीती वाटणार नाही, कोणालाही झुकतं माप दिलं जाणार नाही. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे, हाच आमचा अजेंडा असणार आहे.  या किमान समान कार्यक्रमात शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, लघु उद्योजक, छोटेमोठे उद्योजक शिक्षण, आरोग्य आणि रोजगार सर्व जाती-धर्म, सर्व घटक यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आज शेतकरी, सर्वसामान्य माणूस संकटात आहे, त्यामुळे त्यांना हे आपलं सरकार वाटलं पाहिजे, या आधारावर हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी आणि त्यांच्या मान्यतेने हा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. येणारं आमचं सरकार हे अतिशय मजबूत असणार आहे. या राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बहुमतापेक्षा कितीतरी जास्त संख्याबळ महाविकासआघाडीकडे आहे, असेही  शिंदे यावेळी म्हणाले.

आपलं सरकार