Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Govt. Formation : शपथविधीचा जय्यत तयारी , गर्दी होऊ नये म्हणून परीसरात लावणार एलईडी

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेची जय्यत तयारी चालू असून शिवाजी पार्कात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच हे व्यासपीठ तयार केलं जात आहे. याच जागेवर दरवर्षी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावाही होत असतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनविण्याची शिवसेनेची योजना आहे. देशभरातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात येत आहे. शिवाजी पार्कात तब्बल ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर एका मोठ्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसाठी खुर्च्या लावण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शपथविधीला यावं यासाठीही प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.

Advertisements

उद्या गुरुवारी सायंकाळी ६.४० वाजता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कवर हा सोहळा होईल.  उद्धव ठाकरेंसोबत इतर मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कवर जाऊन मुंबई महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. जवळपास ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे. याशिवाय ६ हजार चौरस फुटाचं व्यासपीठ तयार केलं जात आहे, ज्यावर १०० खुर्च्या असतील. २० एलईडी लावल्या जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे, जेणेकरुन प्रत्येकाला शिवाजी पार्कात येण्याची गरज पडणार नाही.

Advertisements
Advertisements

या शपथविधी सोहळ्याला कोणाला निमंत्रित  करायचे याची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  निश्चित करत आहेत. शपथविधीसाठी अत्यंत कमी वेळ बाकी आहे. पाहुण्यांना लवकरात लवकर मुंबईला येता यावं यासाठी ही यादी बनवण्याचं काम वेगाने सुरू आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!