Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष Live : आज दुपारपर्यंत : मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा , अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा,

Spread the love

अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा . नव्या सरकारला दिल्या शुभेच्छा. सर्वांचे मानले आभार. आम्ही विरोधी पक्षात बसून काम करणार. शिवसेनेनेही मानले आभार : देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, आज सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी माझ्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार स्वगृही 

भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंडखोरी करून गेलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा स्वगृही परतत असल्याच्या बातम्या वृत्त वाहिन्यांवर येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालू आहे . मात्र त्यांचा अधिकृत निर्णय त्यांनी जाहीर केलेला नाही. अजित पवारांसाठी राष्ट्रवादीचा एक गट सक्रीय आहे.अजित पवार आज किंवा उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार करणार असल्याची माहिती एनसीपी के प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी दिली आहे.

अजितदादांसोबत अनेक आमदार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी एक तर हि गोष्ट  फ्लोअर वर दिसेल किंवा स्वतः अजित पवारच  ते जाहीर करू शकतील . दरम्यान अजितदादांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी भान ठेवावं. त्यांना उद्या महाराष्ट्रात फिरायचे आहे. अनेकांना अजितदादा भेटत आहे. शरद पवार साहेब हे हिमालय आहे आणि त्यांच्यासाठी सह्याद्री कधीही धाऊन जाईल, असेही मंगलदास बांदल यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयानंतर आता अजित पवार यांच्यासाठी दोनच  पर्याय शिल्लक आहेत. एक तर पक्षात परत येणे किंवा  पक्षातून निलंबन, यासंबंधी शरद पवार यांना टोकाचा निर्णय घ्यावा लागेल. अजित पवार यांना पक्षातून निलंबित करावे लागणार आहे. अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांचा पक्षाशी संबंध नाही, या बाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माहिती द्यावी लागणार आहे. म्हणजेच गटनेता हा मुद्दा समोर येणार नाही.

काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात 

काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी आमदारांच्या बैठकीत ही घोषणा केली. बहुमत चाचणी (फ्लोअर टेस्ट) आधी हॉटेल जे डब्ल्यु मेरियटमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या गटनेत्यांची निवड करण्यात आली आहे. पुढील २४ तासांत नेमके काय करायचे याबाबत मल्लिकार्जून खर्गे यांनी आमदारांना सूचना दिल्या.

दरम्यान, शिवसेनेचे विधिमंडळनेतेपदी एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे. उद्या, २७ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती रामना, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या न्यायपीठाने हा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे बहुमतचाचणीचे मतदान गोपनिय न घेता ते लाइव्ह टेलिकास्ट करा, असे निर्देशही सरकारला देण्यात आले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आता फडणवीस सरकारकडे ३० तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रणनीती ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

स्वतः शरद पवार मैदानात 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात आपला पराभव होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलेलं असताना उद्या विद्यमान सरकारची बहुमत चाचणी होत आहे.

शरद पवार यांनी आज प्राधान्यक्रमाने अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या फुटीर १३आमदारांसोबत बैठक घेतली आणि त्यांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला . उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांना सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. शरद पवार स्वतः या फुटीर आमदारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी फडणवीस सरकारला मदत न केल्यास अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असू शकतो.

कोण होईल प्रोटेम स्पीकर ?

1) राधाकृष्ण विखे पाटील, 2) कालिदास कोळंबकर, 3) बबनराव पाचपुते, 4) बाळासाहेब थोरात, 5) के सी पाडवी, 6) दिलीप वळसे पाटील यांची नावे हंगामी अध्यक्ष म्हणून नावे देण्यात आलेले असून त्यावर राजपाल निर्णय घेणार आहेत. विधीमंडळाने राज्यपालांना पाठवलेल्या यादीमध्ये कालिदास कोळंबकर यांच्या नावावर हंगामी अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण, रविवारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीसंदर्भात पत्रकारांना माहिती देताना आशिष शेलार यांनी कोळंबकर यांचा उल्लेख सर्वात ज्येष्ठ विधानसभा सदस्य असा केला.  कोळंबकर हे सलग तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

वडाळा मतदारसंघातून ते सलग सात वेळा निवडून आले होते. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची आधी ओळख होती. नंतर कोळंबकर हे नारायण राणे यांच्यांसोबत काँग्रेसमध्ये गेले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांची फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यानुसार, विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाकरता भाजपने त्यांचं नाव पुढे केलं असल्याची चर्चा आहे.

अशी होणार हंगामी अध्यक्षांची निवड

मंत्रिमंडळ बैठकीनंतर विधिमंडळ सचिव राजभवनावर दाखल झालेले असून हंगामी विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी ज्येष्ठ सदस्यांची शॉर्टलिस्ट झालेली यादी घेऊन राज्यपालांना करणार सुपूर्द त्यानंतर राज्यपाल विधानसभा अध्यक्षांची निवड करणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!