Politics Of Maharashtra : सर्व आमदारांना उद्या राजभवनात उपस्थित राहण्याचे आदेश , कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष

Spread the love

राज्याच्या नव्या विधानसभेची  उद्या स्थापना  होणार आहे. त्यासाठी उद्या बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या असून उद्याच नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी होणार आहे.

राजभवनातून एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं असून सर्व नवनिर्वाचित आमदारांना उद्या सकाळी ८ वाजता विधानभवनात आमंत्रित करण्यात आलं आहे. राज्यपालांनी आज सायंकाळी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. त्यामुळे कोळंबकर हे उद्या विधानसभेत सर्व आमदारांना शपथ देणार आहेत. राज्यपालांनी उद्या तातडीने सर्व आमदारांना विधानसभेत बोलावल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्याच्या राजकीय घडामोडींकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

आपलं सरकार