Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live News Update महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण , उद्या सकाळी १०.३० वाजता निकाल , न्यालयालात काय झाले ?

Spread the love

फडणवीस-पवार मंत्रालयात

मुख्यमंत्रीआणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज, सोमवारी फडणवीस-पवार सोबतच मंत्रालयात गेले आणि आपल्या पदांचा कार्यभार स्वीकारला. तत्पूर्वी, या दोन्ही नेत्यांनी विधानभवनाच्या आवारात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारण्यासाठी अजित पवार मंत्रालयाकडे रवाना

देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज पदभार स्वीकारणार

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण , उद्या सकाळी १०.३० वाजता निकाल

आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून त्याच निकाल उद्या  उद्या सकाळी १०.३० वाजता निकाल देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना मुकुल रोहतगी यांनी एकाच याचिकेवर तीन वकील युक्तिवाद करीत असल्याबद्दल आक्षेप नोंदवला . राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले कि , सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदारांना हंगामी अध्यक्ष बनवा; तातडीने बहुमत चाचणी घ्या.

याचिकाकर्त्यांनी १५४ आमदारांच्या पाठिंब्याचे शपथपत्र न्यायालयाला देऊ केले परंतु न्यायालयाने ते घेण्यास नकार देताना म्हटले कि , या याचिकेची कार्यकक्षा मर्यादित आहे; पण दोन्ही पक्ष याला विनाकारण वाढवत आहे. राज्यपालांनी पत्राच्या आधारे निर्णय घेतला. बहुमत राजभवनात नव्हे तर विधानसभेत सिद्ध होतं, विश्वासदर्शक ठरावानंतरच बहुमत सिद्ध होईल अशी टिपण्णीही न्यायालयाने केली. मुख्यमंत्र्याकडे बहुमत आहे का? असा सवालही सुप्रीम कोर्टाने केला.

बहुमत चाचणी तात्काळ घेण्यात यावी, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केली. ते म्हणाले कि , पहाटे ५.१७ वाजता राष्ट्रपती राजवट उठवण्याची आणि ८ वाजता शपथ घेण्याची इतकी घाई का? राज्यपाल आणि फडणवीसांच्या भेटीनंतर पहाटे राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्यावर तुम्ही राष्ट्रपती राजवट उठवण्याला आव्हान दिलेलंच नाही असे भाजपचे वकील मुकूल रोहतगी म्हणाले. मुख्यमंत्र्यांना सविस्तर उत्तर देण्यास २ ते ३ दिवसांचा वेळ मिळायला हवा, कोणताही अंतरिम आदेश या प्रकरणी देऊ नयेअसेही  मुकूल रोहतगी म्हणाले.

आता एक पवार आमच्यासोबत आहेत, दुसरे पवार दुसऱ्या बाजूला आहेत. त्यांच्या कौटुंबिक भांडणाशी आमचं काय संबंध? असे अॅड. मुकूल रोहातगी म्हणाले तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७० आमदारांचे समर्थन, भाजपचे १०५ राष्ट्रवादीचे ५४ त्यामुळे आमदार फोडाफोडीचा प्रश्नच नाही असे  अॅड तुषार मेहता म्हणाले.

मी अजित पवार राष्ट्रवादीचा गटनेता आहे, मला सगळ्या आमदारांचं समर्थन आहे…अजित पवारांच्या पत्रातील मजकूर यावेळी न्ययालयाला वाचून दाखविण्यात आला आणि त्यांचे भाषांतरही न्यायालयाला देण्यात आले. सर्व पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, राज्यपालांनी वेळ दिल्यावर वाट पाहिली. राज्यपालांनी प्रत्येकाला योग्य वेळ दिला असे सांगून अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर रोजी राज्यपालांना दिलेल्या पत्राची प्रतही तुषार मेहता यांनी सादर केली तसेच देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करणारे राज्यपालांचे पत्र, राज्यपालांच्या निर्णयाची प्रत अॅड. तुषार मेहतांनी न्यायालयासमोर सादर केली.

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू ज्येष्ठ वकील मुकुल रोहातगी , अजित पवार यांची बाजू  मणिंदर सिंह , केंद्र सरकारकडून  सॉलिसिटर जनरल तुषार मेहता , याचिकाकर्त्यांकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!