Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live From Hote Grand Hayat : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : शक्ती प्रदर्शन , महाविकास आघाडीची जाहीर ओळख परेड , एकत्र राहण्याची दिली शपथ

Spread the love

भाजपची महाविकास आघाडीवर टीका 

  • महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन संपताच भाजपनेते आशिष शेलार यांनी  तत्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली. शेलार म्हणाले कि , फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटोफिनिश आम्ही करू; आदित्य यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाची शपथ घेतली , त्यांचे हिंदुत्व कुठे गेले ? त्यांच्या या कृतीमुळे मराठी माणसाची मान आज शरमेने खाली गेली, तिन्ही पक्षांनी केलेली ओळख परेड हा पोरखेळ असून भाजपच बहुमत जिंकणार असल्याचा  विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टिपेला पोहोचला असून आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्व आमदारांचे  जोरदार शक्तीप्रर्दशन केले . हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या १६२ आमदारांची परेड करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदार एकत्र एकवटले होते. त्यामुळे हॉटेल ग्रँड हयातमध्ये जणू  विधानसभाची ट्रायलच घेण्यात आली.

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकाच मंचावर आले होते. संविधानाला साक्षी ठेवून हे सर्व शक्तिप्रदर्शन करण्यात आले. प्रारंभी  काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रस्तावना केली. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना एकजूट राहण्यासाठी संविधानाची शपथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार या शक्तिप्रदर्शनासाठी उपस्थित आहेत.

शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट केल्याप्रमाणे महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे  संख्याबळ दाखवण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतला असून हॉटेल ग्रँड हयातमध्ये  हि ओळख परेड  करण्यात येणार असून राज्यपालांनी येऊन ही परेड पहावी, असे  आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून हे आवाहन केले होते कि , आमच्याकडे एकूण १६२ आमदारांचं संख्याबळ आहे. या सर्व आमदारांना हॉटेल ग्रँड हयातमध्ये ठेवण्यात आलं असून आज सायंकाळी ७ वाजता या हॉटेलातच त्यांची पहिल्यांदाच परेड करण्यात येणार आहे. राज्यपाल महोदय, हे सर्व आमदार पाहण्यासाठी तुम्ही याच, असं राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी आज सकाळी राजभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी त्यांनी राज्यपालांना १६२ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रंही दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत बहुमत सादर करण्यात अपयशी ठरल्यास आमच्या आघाडीला सत्तास्थापनेसाठी बोलवण्यात यावं, अशी मागणी यावेळी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपालांकडे केली. तसेच आमच्या आमदारांची परेड करण्याची अवश्यकता असेल तर त्यालाही आम्ही तयार आहोत, असंही त्यांनी राज्यापालांकडे स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यपाल आता काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!