Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी , न्यायालयात काय झाले ?

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने तत्काळ सुनावणी घेतली . न्यायालयाने आज दोन्हीही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि आजची सुनावणी उद्या पुन्हा सुरु राहील असे आदेशित केले. राज्यपाल कार्यालयाने उद्या सकाळी शपथविधीशी संबंधित सर्व कागद पत्रे सादर करण्याचे आदेश देत सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांना नोटीसा  जारी जारी केल्या आहात. यात अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही  समावेश आहे.

Advertisements

सर्वोच्च न्यायालय आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर तातडीची सुनावणी करण्यात आली. न्यायालयासमोर  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली तर भाजपकडून मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकाचा दाखल देत देत अभिषेक मनू सिंघवी आजच बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने द्यावेत, तसेच गुप्त मतदानाऐवजी थेट मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली.  राज्यपालाकडून शपथ देण्याची घाई करण्यात आली असून राज्यपाल कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय, असा प्रश्न सुप्रीम कोर्टात उपस्थित करण्यात आला.

Advertisements
Advertisements

दरम्यान घोडेबाजार रोखण्यासाठी आजच बहुमत चाचणी घ्यायला हवी, असा आग्रह या दोन्ही वकिलांनी कोर्टात धरला. महाराष्ट्रात जे झाले ती  लोकशाहीची हत्या होती. काल ज्यांनी बहुमताचा दावा केला. ते आज विश्वासदर्शक ठरावापासून पळ का काढत आहेत, असा प्रश्न याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उपस्थित केला. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते राहिलेले नाहीत. भाजपकडे जर बहुमत असेल तर त्यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी, असे सिब्बल यांनी म्हटले. राष्ट्रवादीकडे ४१ आमदार असून या आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना दिले आहे, असे सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात यायच्याआधी हायकोर्टात जायला हवे, असे तुषार मेहता यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्र्यांना नोटीस मिळेपर्यंत कोर्टाने कोणताही निर्णय देऊ नये, असे मुकुल रोहतगी म्हणाले.

राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न चालू असतानाच शनिवारी सकाळी भाजपने कोणालाही थांगपत्ता लागू न देता  राज्यपालांकडून  भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील जवळपास सर्वच्या सर्व आमदार शरद पवार यांच्याकडे असल्याने अजित पवारांनी कोणत्या आमदारांच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तसेच देवेंद्र फडणवीस यांना बहुमताचा आकडा पार करण्यासाठी लागणारे १४५ आमदारांचे संख्याबळ कुठे आहे?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!