Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष Current News Update Live : अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं , लोकांमध्ये गैरसमज आणि संभ्रम निर्माण करणारं ’, शरद पवार यांचे ट्विट

Advertisements
Advertisements
Spread the love

  • ‘भाजपसोबत आघाडी करण्याचा कोणताही संबंध नाही. राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून ते लोकांमध्ये गैरसमज आणि संभ्रम निर्माण करणारं आहे’, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या ट्वीटनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी फक्त शिवसेना आणि काँग्रेससोबतच जाणार आहे. अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर काही मिनिटातच शरद पवारांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

  • राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. ‘नैतिक आधारावर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राजीनामा द्यायला हवा. त्यांनी भाजपाशी मिळवत कृती केली आहे. हे दुर्दैवी आहे,’ असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.
  • आमचे आमदार फोडण्याचे भाजपकडून प्रयत्न; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा आरोप
  • भाजप आणि राष्ट्रवादी राज्यात ५ वर्ष स्थिर सरकार देणार; अजित पवार यांचा दावा
  • भाजपची पत्रकार परिषद , विश्वासदर्शक ठराव संमत करण्याची रणनीती तयार 

देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे अभिनंदन आणि पाठिंबा . आशिष शेलार कालिदास कोळंबकर , बबनराव लोणीकर , बबनराव पाचपुते पत्रकार परिषद घेत आहेत.  शिवसेनेने जनाधाराची कुचेष्टा केली. काँग्रेस -राष्ट्रवादी बरोबर जाण्याचे महापाप सेनेने केले आहे. फडणवीस -पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत. बहुमत चाचणी आम्ही जिंकू आणि पाच वर्षे काम करू. आमचे आमदार मुक्त आहेत कारण त्यांचा पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे . ज्यांचा विश्वास नाही त्यांनी आपल्या आमदारांना डांबून ठेवले आहे.

  • भाजप नेत्यांची बैठक सुरु 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष टोकाला पोहोचला असून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बहुमत चाचणी तत्काळ घ्यावी म्हणून शिवसेना -काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे  बहुमत चाचणीचे आव्हान पेलण्यासाठी भाजप नेत्यांची बैठक चालू झाली आहे . या बैठकीसाठी दिल्लीहून केंद्रीय मंत्री पियुष गोयल पोहोचले आहेत.  मुंबईतील वसंतस्मृती येथे ही बैठक होत असून, या बैठकीत बहुमताच्या आकड्यासंदर्भात चर्चा चालू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत .

  • उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; हॉटेल रेनेसाँमध्ये दाखल

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पवईतील हॉटेल रेनेसाँमध्ये दाखल झाले आहेत. या भेटीत उद्धव ठाकरे पवारांशी चर्चा करणार असून, आमदारांच्या फोडाफोडीचं आव्हान कसं रोखायचं यावर दोन्ही नेत्यांंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून, उद्या निकाल येण्याची अपेक्षा आहे. यावरही दोघांमध्ये चर्चा होऊ शकते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे सोबत आहेत. बंद दारा आड उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक चालू आहे.

  • अजित पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न असफल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनियुक्त गटनेते जयंत पाटील हे गेल्या तासाभरापासून समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवार यांनी अचानक भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. तेव्हापासून अजित पवार माध्यमे आणि पक्षापासून दूर असून, राष्ट्रवादीकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न असफल झाले असल्याचे वृत्त आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!