Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : राष्ट्रवादीतील वादावर बारामतीत ” फ्लेक्स ” लागला आणि काढलाही !! अजित पवार यांनीही दिली ” हि ” प्रतिक्रिया ….

Spread the love

राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर बारामतीकर नेमके कोणासोबत आहेत याचे उत्तर बारामती मध्ये पोस्टर लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे .  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी बाहेर पडून भाजपला पाठींबा देण्याचा धाडशी निर्णय घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवारांच्या बारामतीत दोन पवार गट पाहायला मिळत असून  शरद पवार यांना पाठींबा देण्यासाठी बारामतीत पोस्टर लावून शरद पवारांना पाठिंबा दिला आहे.

बारामतीत लावलेल्या पोस्टर्समध्ये ‘आम्ही ८० वर्षाच्या योध्यासोबत!’, समस्त बारामतीकर, असे शब्द दिसत आहेत.  शरद पवार हे सध्या मुंबईत असून बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.आता अजित पवार यांच्यासोबत कोण कोण आमदार आहेत , हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवार यांनी आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक घेऊन राष्ट्रवादीचे सर्व आमदार पक्षात परत येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर मला सध्या काहीही बोलायचं नसून वेळ आल्यावर मी माझी भूमिका मांडणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान आता हा फलक काढण्यात आला असून बारामतीतही कार्यकर्त्यांचे दोन तट पडले आहेत. येथील तरुण कार्यकर्ते अजित पवारांबरोबर तर सिनियर कायकर्ते शरद पवारांबरोबर असल्याचेचित्र दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!