Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics Of Maharashtra : देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचे चित्र दिसले खरे पण रात्रीतून काय आणि कसे घडले ?

Spread the love

भाजपने अत्यंत गुप्तपणे कुणालाही थांग पत्ता न लागू देता राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विट आणला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून सोबत शपथ घेण्यास भाग पडले त्यामुळे राज्यत मोठा राजकीय भूकंप झाला आहे अर्थात अजित पवार हे या भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.  एका रात्रीत हा सगळा खेळ कसा झाला आणि थेट शपथविधी कसा करण्यात आला ? असा प्रश्न राजकीय वर्तुळासोबतच राज्यातल्या जनतेला देखील पडला आहे. मात्र, आता शुक्रवारी रात्री कशा घडल्या? याचा घटनाक्रमच समोर आला आहे. वाचा कधी काय घडलं! दिवसभरात काल मध्य रात्री काय आणि कसे घडले याचे घटनाक्रम मध्यमांकडून शोधले जात आहेत.

अर्थात हे सुद्धा समाजाने अवघड नाही कि , अजित पवार यांच्याशी ते काल बोलले आणि आज त्यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हि चर्चा आधीपासूनच चालू असणार हे नक्की . या नाट्याची संहिता किणी लिहिली हे लवकरच बाहेर येईल हे मात्र नक्की.

असे सांगण्यात येते कि , महाराष्ट्रातील राजकारणावर आजवर एक शब्दही न बोलता पंतप्रधानांनी आज थेट देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे ट्विट करून या वादावर त्यांच्याकडून पडदा टाकला. दरम्यान या सर्व सत्ता नाट्यामचे निर्माते दिग्दर्शक अमित शहाच असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत बिहारचे भाजपाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी टि्वट करताना म्हटले आहे कि , अमित शाह यांनी पुन्हा एकदा भारतीय राजकारणामधील आपण चाणक्य असल्याचे सिद्ध केले आहे असे वृत्त एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

रात्रीतून नेमके काय घडले ? 

उपलब्ध वृत्तांनुसार असे सांगण्यात येते कि , काल रात्री आठच्या सुमारास महाविकास आघाडीची बैठक संपली. या बैठकीतून बाहेर पडताना शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती झाल्याचे विधान केले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह उद्धव ठाकरेंनी सुद्धा चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती दिली. आणि त्यानंतर भाजपचा रात्रीचा खेळ सुरु झाला.

  • दरम्यान राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेच्या  सत्ता स्थापनेसाठी बैठकांवर बैठक चालू असल्या तरी त्यातून काहीही ठोस निष्पन्न होताना दिसत नव्हतं. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात मात्र शांतता दिसत होती. खरतंर ती वादळापूर्वीची शांतता होती. पडद्यामागे बरेच काही घडत होते असे आज दिलेले आहे मात्र याची कोणालाही माहिती नवहती . असे वृत्त आहे कि , पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचे निकटवर्तीय, विश्वासू सहकारी भूपेंद्र यादव यांना कोणालाही थांग पत्ता न लागत मुंबईत पाठवलं.
  • अर्थात अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि काही नेत्यांच्या संपर्कात होते तसे ते अजित पवार यांच्याही संपर्कात होते . मध्यरात्रीच्या सुमारास देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सत्ता स्थापनेसंबंधी एकमत झालं. काही मिनिटात अमित शाह यांना फोन करुन दोन्ही नेत्यांमध्ये काय ठरलं त्याची माहिती देण्यात आली.
  • वृत्त असे आहे कि रात्री २ वाजता देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव आणि अजित पवार यांच्यात मुंबईमध्ये चर्चा सुरु होत्या. त्याचवेळी दिल्लीत अमित शाह जागे होते. महाराष्ट्रात सरकार स्थापनेपूर्वी घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे अत्यंत बारीक लक्ष होते.
  • रात्रीच महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिवांना राष्ट्रपती राजवट हटवण्यासंबंधी पावले उचलण्यास सांगण्यात आले.
  • माध्यमांनी दिलेल्या  माहितीनुसार भाजपाला सकाळी ६.३० वाजताच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा कार्यक्रम करायचा होता. पण सकाळीच शपथविधी शक्य असल्याचे भाजपा नेतृत्वाला कळवण्यात आले. तास-दीड तास थांबावे लागेल हे भाजपाला सांगण्यात आले.
  • सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यानंतर सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
  • रात्री ११.४५ वा. – अजित पवार आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात एकमत झालं.
  • रात्री ११.५५ वा. – देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यातल्या कुणीही सत्तास्थापनेचा दावा करण्याआधी भाजपने दावा करण्याविषयी पक्षातल्या नेत्यांशी बातचित केली.
  • रात्री १२.३० वा. – राज्यपालांनी त्यांची दिल्ली भेट रद्द केली.
  • रात्री २.१० वा. – राज्यपालांच्या सचिवांना सकाळी ६.३० वाजता शपथविधीची तयारी करण्याचे निर्देश दिले.
  • रात्री २.३० वा. – राज्यपालांच्या सचिवांनी राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यासंदर्भातली फाईल पुढच्या दोन तासांमध्ये सादर करू, शपथविधी ७ वाजून ३० मिनिटांनी घ्या अशी माहिती दिली.
  • पहाटे ५.३० वा. – अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं राज भवनावर आगमन.
  • पहाटे ५.४७ वा. – महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यात आली. मात्र, त्यासंदर्भात घोषणा ९ वाजता करण्याचं ठरलं.
  • सकाळी ७.३० वा. – राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शपथविधीला सुरुवात झाली.
  • सकाळी ८.०७ वा. – देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शपथ घेत असल्याचं वृत्त समोर आलं.
  • सकाळी ८.१६ वा. – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं.

आणि दिवसभराचा घटनाक्रम राज्याच्या समोर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!