Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर केली बगलामुखी देवीची तंत्र -मंत्र पूजा : चर्चेतली बातमी…

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपने शनिवारी सकाळी राज्यालाच नाही तर देशालाच एक राजकीय हादरा  दिला. तत्पूर्वी राजभवनावर, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आणि थेट दिल्लीत काय घडामोडी झाल्या हे हळूहळू उजेडात येत आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या आधी मुंबईतल्या निवासस्थानी होम हवन करून तंत्र -मंत्र पूजा करण्यात आल्याची चर्चा आहे. मध्यरात्री  एक ते दीडच्या आसपास हवन आणि अनुष्ठान देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांनी केल्याचे म्हटले जात आहे . मध्य प्रदेशातल्या माळव्यातल्या एका मंदिरातल्या तंत्रविद्या पंडितांनी हे हवन अनुष्ठान केले  आणि आहुतीही दिली.

Advertisements

याबाबतचे अधिक वृत्त असे आहे कि , माळव्यातल्या नलखेडा इथले माँ बगलामुखी मंदिरातले ४ पंडित हे खास अनुष्ठान करण्यासाठी आले होते. हे मंदिर तंत्र आणि इथली देवता तंत्रविद्येच्या पंडितांमध्ये लोकप्रिय आहे, असे सांगितले जाते . या अनुष्ठानाने बगलामुखीचा आशीर्वाद मिळाला तर विजय निश्चित असतो अशी श्रद्धा आहे. माता बगलामुखी मंदिर मध्य प्रदेशातल्या माळव्यातलं तंत्रविद्येसाठीचं प्रसिद्ध मंदिर आहे. महाभारत युद्धापूर्वी पांडवांनी विजयासाठी या मंदिरात याच देवतेला प्रसन्न करून घेतलं होतं, अशीही अख्यायिका आहे.

Advertisements
Advertisements

याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातील एका पुजाऱ्याने हि पूजा काल रात्री नाही तर पूर्वीच केल्याचे म्हटले असले तरी पूजा करण्यात आली हे वृत्त त्यांनी नाकारले नाही.

दरम्यान शिवसेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्ता स्थापनेबद्दल चर्चा केल्या जात असतानाच मध्य रात्रीच चक्रे फिरवून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला जाग येण्याच्या आताच आपला आणि अजित पवार यांचा शपथविधी उरकून घेतला आणि मोदी आणि शहा यांनी त्यांचे अभिनंदनही केले. ३० नोव्हेंबरला फडणवीस सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागेल.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!