Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics Of Maharashtra : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , चर्चा सकारात्मक पण संपलेली नाही , आज पुनः सुरु होईल चर्चा

Spread the love

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सत्तास्थापनेविषयीची बैठक संपल्यानंतर   राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी बैठकीतल्या निर्णयाबद्दल संवाद साधला. चर्चा सकारात्मक झाली असली तरी अजून चर्चा संपली नाही, इतक्याच मोजक्या शब्दात बोलत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि , अजून काही मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे आणि उद्याही चर्चा सुरू राहणार आहे.

महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या दृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची पहिली औपचारिक बैठक मुंबईत नेहरू सेंटरला झाली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तिन्ही पक्षातील महत्त्वाचे नेते सहभागी झाले आहेत. या बैठकीतून सत्तास्थापनेचा अंतिम तोडगा निघणार की अजून वाट पाहावी लागणार हे उद्या स्पष्ट होईल. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेहरू सेंटरमध्येझालेल्या या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राष्ट्रवादीचे अजित पवार, नवाब मलिक, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत. तर उद्धव ठाकरेंबरोबर आदित्य , मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!