Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics in Maharashtra मोठी बातमी : अजित पवारांचे बंड , झाले उपमुख्यमंत्री , देवेन्द्र फडणवीस मुख्यमंत्री

Spread the love

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस स्वप्नांवर आणि धक्का देणारा ठरला. महाराष्ट्र पहाटे जागा झाला तेंव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झालेले दिसले. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का दिला. त्यांच्या या धडाकेबाज कृतीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे हे मात्र खरे. दरम्यान शरद पवारांनी यावर आपली तीव्र प्रतिक्रिया देताना आपला याला पाठिंबा नसल्याचे म्हटले आहे.

राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज शनिवारी घडली.  देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. ३० नोव्हेंबर पर्यंत फडणवीस सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं.

शपथविधीनंतर बोलताना फडणवीस म्हणाले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे,  मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले.

यावर बोलताना अजित पवार म्हणाले कि , २४ तारखेपासून कोणीही सरकार बनवू शकलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं.

दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. राज्याच्या निवडणुकीत लोकांच्या आदेशाचा सन्मान झाला असता तर अधिक चांगलं झालं असतं असं फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासमोर जी आव्हानं आहेत त्याचा सामना समर्थपणे करू. पाच वर्षे ताकदीनं सरकार चालवू असेही फडणवीस म्हणाले. नवं राजकारण न पटल्यानं अजित पवार यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आणि आम्ही सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला. खिचडी सरकार बनवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळं राष्ट्रपती राजवटीची वेळ आली. महाराष्ट्राच्या जनतेनं स्पष्ट जनादेश दिला होता. पण मित्रपक्षानं वेगळी भूमिका घेतली अशी टीका त्यांनी यावेळी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!