Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Live : सेना-काँग्रेस-राष्ट्रवंडीची सर्वोच्च न्यायालयात याचिका, उद्या सकाळी ११.३० वाजता सुनावणी

Spread the love
  • जयंत पाटील यांची नियुक्ती अवैध असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला असून संजय राऊत यांनाकलाकार  २०१९ पुरस्कार द्यावा अशी टीका केली आहे. याशिवाय  युतीसोबत शरद पवार यांच्या कुटुंबातील कलहाला संजय राऊत जबाबदार आरोपही त्यांनी केला आहे.
  •  सत्ता स्थापनेविरोधातील तीनही पक्षांच्या संयुक्त याचिकेवर उद्या सकाळी ११.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
  •  वाय. बी. चव्हाण सेंटरमधील राष्ट्रवादीची बैठक संपली; हॉटेल रेनेसान्सकडे आमदार रवाना
  • अजित पवार यांचे व्हिप काढण्याचे अधिकारही काढले.
  • विधीमंडळ पक्षपदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्या विधीमंडळ गटनेतेपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
  • राजभवनावर झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सकाळी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. त्यावेळीच कायदेशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचे तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले होते.
  • शिवसेनेचे आमदार मुंबईतील हॉटेल ललितमध्ये वास्तव्यास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आमदारांना शांत राहण्याचा सल्ला दिला. आज जे घडलय, त्यामुळे सर्वानांच धक्का बसला आहे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
  • बेपत्ता आमदार संजय बनसोडे यांना शोधून आणले; राष्ट्रवादीच्या बैठकीला ५० आमदार उपस्थितः सूत्र
  • मुंबईः शिवसेना नेते एकनाथ शिंदे, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित
  • अजित पवार यांनी कोणताही वेगळा गट स्थापन केला नाही. मी शरद पवारांसोबत; राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांची प्रतिक्रिया
  •  अजित पवार परतण्याच्या निराधार… पक्षफुटी वाचवायची असेल, तर भाजपसोबत चला; अजित पवार यांचा आमदारांकरवी शरद पवार यांना निरोप
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याने  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे . जवळपास बारा आमदार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले होते. मात्र, शपथविधीला हजर असलेले आठ आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले आहेत. मात्र, इतर आमदारांशी अद्यापही संपर्क झालेला नाही, असे  राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितले आहे.
  • अजित पवारांची मनधरणी अयशस्वी, तीन नेते परतले. सकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आहेत. योग्यवेळी आपण प्रतिक्रिया व्यक्त करू असं अजित पवार काही वेळापूर्वी म्हणाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या भेटीसाठी गेले खरे पण मनधरणी करण्यात अयशस्वी झाल्याचे वृत्त आहे.
  • भाजपच्या नव्या घोषणा : देवेंद्र -पवार आज बढो हम तुम्हारे साथ है ! फडणवीस -पवार आज बढो हम तुम्हारे साथ है !
  • मोदीजी  है तो मुमकिन है म्हणत पंतप्रधान मोदी , अमित शहा , चंद्रकांत पाटील , सर्व कार्यकर्ते आणि जनतेचे मानले आभार.
  • स्थिर सरकारसाठी अजितदादा पवार यांनी सरकार बनविण्यास साथ दिली.
  • आपली बांधिलकी जनतेशी.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करीत आहेत.
  • भाजपच्या मुंबईतील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष .
  • अजित पवारांच्या भूमिकेची शरद पवारांना कल्पना नव्हती का ? आणि शरद पवारांवर तुमचा विश्वास आहे का ? असे विचारले असता ते म्हणाले यावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही : अहमद पटेल
  • विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आम्ही तिन्हीही पक्ष मिळून एकत्र निर्णय घेऊ
  • आमचे सर्व आमदार आमच्या सोबत आम्ही सरकार बनवू शकतो आणि सरकार बनविणार
  • आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत आहोत.
  • भाजपचे हे कांड आहे . आमची चर्चा सकारात्मक चालू होती . काँग्रेसने उशीर केला नाही . काही मुद्द्यावर चर्चा होणे आमच्या दृष्टीने गरजेचे होते .
  • उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांना फोन केला आणि तत्वतः आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आम्ही जाण्याचा निर्णय घेतला.
  • भाजपचा आम्ही निषेध करतो. सत्ता स्थापनेचा प्रयत्न चालू आहोत.
  • काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण द्यायला हवे होते. संविधानाची अवहेलना .
  • काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला सुरुवात , अहमद पटेल बोलताहेत.
  • पवारांना पात्रांनी विचारले तुम्ही सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणार होता म्हणून हे अजित पवार भाजपसोबत गेले का ? त्यावर पवार हसून म्हणाले तुमच्याकडे अशी काही माहिती आहे का ? सुप्रिया सुळे खासदार आहेत . त्यांचा काही विषयच नाही.
  • वाय.बी .चव्हाण सेंटर मधून राष्ट्रवादी  -सेनेचे  नेते बाहेर पडले . कार्यकर्त्यांची तुफान घोषणाबाजी.
  • पवारांच्या भूमिकेवर कुठलेही भाष्य करणार नाही असे कालच पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच सांगितले होते.
  • अजित पवारांसोबत गेलेले पाच आमदार पवारांकडे परत
  • फुटीर आमदारावर काय कारवाई करणार ? आमची समिती निर्णय घेईल : शरद पवार
  • कायदेशीर पेच आहे का ? याचा अभ्यास आम्ही करू , अद्याप काहीही बोलता येणार नाही : शरद पवार
  • काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची कोणताही नेता पत्रकार परिषदेला उपस्थित नाही .
  • हम सरकार बनायेंगे . सरकार बनविण्यासाठी आमच्याकडे बहुमत आहे. : शरद पवार
  • शरद पवार : अशा धक्क्यांची मला सवय आहे .
  • उद्धव ठाकरे : लोकशाहीच्या नावाने खल चालू आहे. आमचे सगळे दिवस होते . रात्रीस खेळ चाले हे आमच्या तत्वात बसत नाही.  आम्ही सगळे एकत्र आहोत.
  • शरद पवार : भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. आमचे नेतृत्व शिवसेनाच करेल असा आमचा तिन्हीही पक्षांचा निर्णय आहे. आम्ही एकत्र आहोत.  संकटाला तोड देऊ.
  • आणखी एका  आमदाराने हेच सांगितले.
  • आ. संदीप सिरसाठ , बीड : फोन आल्याने मी गेलो , शिंगणे यांनी सांगितल्याप्रमाणे झाले.
  • अजितदादांच्या फोन आला . मला बोलावले . तेथे ८-१० आमदार त्या ठिकाणी आले. आम्हाला राजभवनावर नेले . हॉलमध्ये बसवले . काय होणार हे ? हे माहित नव्हते . राजभवनावर देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील तेथे आले . राज्यपाल आले आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी शपथ घेतली . त्यानंतर मी पवार साहेबांकडे आलो आणि सगळी माहिती दिली. आम्ही साहेबांबरोबर : राजेंद्र शिंगणे
  • बंडखोरांचा आम्ही पराभव करू . १० – ११ सदस्य त्यांच्यासोबत आहेत अशी माहिती आहे. त्यापैकी काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे.
  • पक्षाचा कुणीही कार्यकर्ता त्यांच्यासोबत नाही , पक्षांतर बंदीचा कायदा आहे .
  • सकाळी साडे सहा वाजता सहकारी कार्यकर्त्याचा फोन , राष्ट्रवादीचे काही नेते राजभवनावर गेले आहेत.
  • शरद पवारांची पत्रकार परिषद सुरु : आमच्याकडे बहुमत
  • यशवंतराव चव्हाण केंद्रावर अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी.
  • शरद पवार , शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे अधिकृत निवेदन १२.३० वाजता दिले जाईल : खा. सुप्रिया सुळे , राष्ट्रवादीच्या नेत्या
  • आम्ही म्हटलंच होतं की, मा.नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह हे समजायला अजून बरेच जन्म घ्यावे लागतील! चाणक्य समजण्यासाठी ही ती योग्य वेळ आहे असा टोला आशिष शेलार यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला लगावला आहे.
  • आम्ही जनतेसोबत आहोत अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
  • संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. आता तरी बोलणं बंद कर ना बाबा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना टोला
  • ‘अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपने त्यांना तसं करण्यास भाग पाडलं आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
  • अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिलाय – संजय राऊत
  • महाराष्ट्राच्या नजरेला नजर भिडवून शपथ का घेतली नाही – शिवसेनेचा सवाल
  • अजित पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही; शरद पवारांचं ट्विट
  • राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या भेटीला
  • राष्ट्रवादीमध्ये उभी फूट; २२ आमदार अजित पवारांसोबत असल्याची माहिती
  • ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्रिपदी अजित पवार यांनी शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे.’ अशी प्रतिक्रिया नितीन गडकरींनी ट्विटरवर दिली आहे.
  • ‘मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांचं अभिनंदन. मला विश्वास आहे ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करतील,’ असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

राजभवनात शनिवारी सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे हरणारी मॅचही भाजपने जिंकली आहे.

अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे मात्र अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत आणि केले जातील पण आता व्हायचे ते होऊन गेले आहे. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली का? अजित पवार महाविकास आघाडीत होत असलेल्या चर्चांबाबत नाराज होते का? हे सगळे नाट्य असंवैधानिक आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि होतीलही.

गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीकडून सातत्याने बैठकांचा गोंधळ सुरू होता. आज चर्चा अंतिम टप्प्यात येणार असल्याची चर्चाही होती. अखेरच्या टप्प्यात सगळे ठरत असताना मात्र अचानक राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ झाली. राजभवनात थेट मुख्ममंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. महाविकासआघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार होती मात्र त्याआधीच शनिवारी शपथविधीसोहळा पार पडल्याने अनेक प्रश्न  उपस्थित होत आहेत. महिन्याभरापासून सुरु असलेला सत्तसंघर्षाचा तिढा अखेर सुटला आणि एक वेगळं समीकरण समोर आलं आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत  असले तरी यात आश्चर्य काहीही नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!