Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दामदुपटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना १ कोटी ४३ लाख रूपंयाचा गंडा, कर्नाटकच्या तीन भामट्यांविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंंगाबाद : आमच्या वंâपनीत पैसे गुंतविल्यास पुढील वीस आठवड्यात दामदुप्पटीने पैसे परत देतो असे आमिष दाखवून कर्नाटकातील तीन भामट्यांनी शहरातील गुंतवणूकदारांना १ कोटी ४३ लाख ६९ हजार ५०० रूपयांचा गंडा घातला. गुंतवणूकदारांना गंडा घालणा-या तीन भामट्यांविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहमंद रिझवान चमन, नाजीया कौसर मोहमंद रिझवान चमन, सय्यद अनिस, सर्व रा. चित्रदुर्ग, कर्नाटक अशी फसवणूक करणा-या भामट्यांची नावे आहेत. संजयनगर बायजीपुरा परिसरातील रहिवासी पठाण अन्वर खान ईस्माईल खान (वय ३७) यांचा आर.ओ. फिल्टर मशीन विक्रीचा व्यवसाय आहे. पठाण अन्वर खान यांनी जुलै २०१८ मध्ये मोहम्मद रिझवान चमन याच्यासोबत सय्यद अनिस याने ओळख करून दिली होती. त्यावेळी मोहम्मद रिझवान चमन याने आपली एव्हरग्रीन बिझनेस सोल्युशन (ओपीसी) प्रा.लि. ही आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेली संस्था आहे. या संस्थेला भारत सरकारतर्पेâ पॅनकार्ड देखील मिळाले असून आमच्या संस्थेत पैशाची गुंतवणूक केल्यास तुम्हाला पुढील २० आठवड्यात दामदुपटीने पैसे देतो असे आमिष दाखविले. पठाण अन्वर खान यांचा मोहम्मद रिझवान चमन याच्यावर विश्वास बसल्याने त्यांनी आपल्याकडील पैसे व आपले मित्र नातेवाईक यांच्याकडून घेतलेले १ कोटी ३४ लाख ६४ हजार रूपये मोहम्मद रिझवान चमन यांच्या वंâपनीत ७ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०१८ या काळात गुंतवले होते.

प्रारंभीच्या काळात मोहम्मद रिझवान चमन याने गुंतवणूकदारांना काही प्रमाणात परतावा दिल्यामुळे गुंतवणूकदरांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. परंतु नंतर-नंतर मोहम्म्द रिझवान चमन याने पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. तसेच प्रत्येकवेळी मोहम्मद रिझवान चमन व त्याची पत्नी नाजीया कौसर हे उडवा-उडवीची उत्तरे देत होती. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर पठाण अन्वर खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून मोहमंद रिझवान चमन, नाजीया कौसर मोहमंद रिझवान चमन, सय्यद अनिस यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकटेश वेंâद्रे करीत आहेत

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!