Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवसेनेसोबत सरकार बनवणे म्हणजे काँग्रेस पक्षाला गाडण्यासारखे , संजय निरुपम यांचे ट्विट…

Spread the love

राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने  काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त येताच काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याला विरोध दर्शवला असून  शिवसेनेसोबत सरकार बनवणं म्हणजे काँग्रेस पक्षाला गाडण्यासारखं आहे असं  म्हटलं आहे.

आपल्या ट्विट मध्ये संजय निरुपम यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे की, “काही वर्षापुर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करत चूक केली होती. तेव्हा काँग्रेसला असा फटका बसला होता, ती आजपर्यंत उठू शकलेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा ते तीच चूक करत आहेत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होणं म्हणजे काँग्रेसला जमिनीत गाडण्यासारखं आहे”. संजय निरुपम यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी दबावात येता कामा नये असं मत व्यक्त केलं आहे.

पूर्वीपासूनच संजय निरुपम यांनी शिवसेनेसोबत जाण्यास विरोध दर्शविला असून आपले मत त्यांनी हायकमांडला कळविले आहे तरीही हालचाली चालूच असल्याने त्यांनी आज पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे. “सरकार कोण आणि कसं स्थापन करतंय हा प्रश्न महत्त्वाच नाही, तर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल ही शक्यता कोणीच नाकारु शकत नाही. राज्यात नव्याने होणाऱ्या निवडणुकांसाठी तयार राहा. कदाचित २०२० मध्ये पुन्हा निवडणूक होईल. मग आपण त्यावेळी शिवसेनेसोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहोत का ?,” असा सवाल संजय निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला होता. संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करणं धोक्याचं पाऊल असल्याचं सांगत इशारा देण्याचा प्रयत्न केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!