Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : काँग्रेस -राष्ट्रवादी स्थिर सरकार देण्यासाठी सकारात्मक , लवकरच बनवू सरकार , बैठकांचा खेळ न संपणारा….

Spread the love

आज शरद पवारांच्या सहा जनपथ या निवासस्थानी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक गेल्या तीन तासांपासून चालू असून बैठकीतून बाहेर येत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि आ. नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले कि , काँग्रेस -राष्ट्रवादीमध्ये  स्थिर सरकार देण्यासाठी सकारात्मक चर्चा चालू असून लवकरच महाराष्ट्राला सरकार मिळेल. अजून दोन दिवस या चर्चा चालू राहतील त्यानंतर निर्णय जाहीर करण्यात येईल. ( मराठी नंतर हिंदी आणि इंग्रजीतून हीच माहिती देण्यात आली आणि हे दोन्हीही नेते उठून गेले. ) आणि पत्रकार सर , सर म्हणत प्रश्न विचारात राहिले.

सत्ता स्थापनेची चर्चा अजून किती दिवस चालू राहणार ? शिवसेनेसोबत जाणार का ? सरकार नेमके केंव्हा बनणार ? कुठले सामान सूत्र ठरले आहे ? असे अनेक प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले खरे पण यापैकी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आज या नेत्यांकडे नव्हते हेच यातून दिसून आले.

पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मलिक यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात गेल्या २१ दिवसांपासून असलेली अस्थिरता लवकरच संपुष्टात येणार आहे. आणखी दोन-तीन दिवस दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू राहिल, ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार देण्यात येणार आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील सत्तापेच आणखी काही  दिवस ‘जैसे थे’ राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!