Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घुसून अपघात , संत नामदेवांच्या वारसाचा मृत्यू

Spread the love

वारकऱ्यांच्या दिंडीत जेसीबी घूसून झालेल्या भीषण अपघातात संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू झाला आहे. ते ३६ वर्षांचे होते. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला असून अतुल महादेलव आळशी (२४) असे दुसऱ्या मृत पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. या भीषण अपघातात अपघातात १५ वारकरी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे राज्यातील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दिवे घाटातील तिसऱ्या वळणावर हि दुर्घटना घडली.

जखमींवर हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

संत नामदेव महाराजांची पालखी घेऊन जाणारी गीदिंडी पंढरपूर ते आळंदी अशी जात होती. आज (मंगळवार) सकाळी साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला. ही दिंडी दरवर्षी पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करते. ही दिंडी दिवे घाटातील मुक्कामानंतर घाट उतरत असताना सासवडहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या जीसीबी चालकाचे ब्रेक फेल झाल्यामुळे नियंत्रण सुटले आणि हा जेसीबी वेगात दिंडीत घुसला. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर १५ वारकरी जखमी झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!