Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Politics : पवारांच्या विधानामुळे प्रसार माध्यमे संभ्रमात , असे काय बोलले ?

Spread the love

राज्यातील सत्तास्थापनेबाबत सर्व राजकारण्यांचे आणि माध्यमांचे लक्ष आज दिल्लीत होणाऱ्या पवार -सोनिया यांच्या बैठकीकडे लागलेले असतानाच पवारांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना   “सत्तास्थापनेबद्दल शिवसेना-भाजपानं बघावं,” असं पवार यांनी असे म्हटल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रमही ठरला असून, यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज सोमवारी (१८ नोव्हेंबर) चार वाजता भेट घेणार आहेत. त्यापूर्वी शरद पवार यांनी सकाळी आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली.

शरद पवार दिल्लीत दृष्टिक्षेपास पडताच माध्यमांनी त्यांना महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबद्दल प्रश्न विचारला होता.

पत्रकारांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज संभ्रम वाढवणारं विधान केलं आहे. याबाबत बोलताना त्यांनी , तुम्ही हे शिवसेना आणि भाजपला विचारायला हवे , असे  उत्तर दिल्याने  प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी चांगलेच गोंधळात पडले.

दरम्यान महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या होणाऱ्या भेटीवर सर्वांचे लक्ष आहे. शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. आज सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, त्यांनी भेटीची निश्चित वेळ सांगितली नाही. या भेटीतून सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल असे बोलले जात असतानाच  पवारांनी संभ्रम वाढवणारे  विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  सोनिया गांधी यांच्याशी होणारी भेट ही शिष्टाचाराचा भाग आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. यातून ते सोनिया गांधी यांच्या भेटीअगोदर आपले पत्ते उघड करू इच्छित नाहीत, हे स्पष्ट होत आहे.

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करणार का, असं पवार यांना पत्रकारांनी विचारलं. त्यावर ‘भाजप आणि शिवसेनेला विचारा, ते एकत्र होते,’ असं उत्तर पवार यांनी दिलं. शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. आम्ही स्वतंत्र लढलो होतो म्हणजे  राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एकत्र लढले होते, असे  ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!