Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics Of Maharashtra Effect : अखेर सत्तारुढ एनडीएमधून शिवसेना बाहेर : सांसदीय मंत्री प्रल्हाद जोशी

Spread the love

अखेर आपल्या लोकसभेतील १८ आणि राज्यसभेतील तीन खासदारांसह शिवसेना सत्तारुढ एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.

नव्या सत्तास्थापनेत मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा यावरून भाजप-शिवसेना युतीवरुन टोकाचा वाद झाला ३० वर्षांचा आघाडीचा मित्र भाजपने गमावला.
दरम्यान महायुतीचे सरकार बनू न शकल्याने शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चा देखील सुरू झाली आहे. दुसरीकडे, मोदी मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री असलेले अरविंद सावंत यांनीही गेल्या सोमवारी पदाचा राजीनामा दिला आहे. ‘अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळं ते एकप्रकारे एनडीएतूनच बाहेर पडले आहेत. सहाजिकच, त्यांना लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षांच्या बाकावर बसवले जाईल, असं ते म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना ही माहिती दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या राज्यसभेतील तिन्ही सदस्यांना विरोधी पक्षाची आसने देण्यात आली आहेत. लोकसभेत आसन व्यवस्था वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
वास्तविक महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेत बिनसलं आणि शिवसेना जवळजवळ एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात होते मात्र, त्याबाबत भाजप किंवा शिवसेनेच्या नेत्यांनीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती.
दरम्यान संसदेत बसण्याची जागा बदलली असल्याची माहिती मिळाल्याचे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनीही सांगितलं होतं. शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं ते कालच म्हणाले होते. मात्र, आता भाजप नेते आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीच या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील शिवसेनेच्या खासदारांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. त्यांची व्यवस्था विरोधी पक्षात केली आहे,’ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!