Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ओवेसी यांचे ट्विट : मला माझी मशीद पुन्हा हवी आहे….

Spread the love

एम आय एम चे प्रमुख खा . ओवेसी यांनी आज एक ट्विट करून ‘मला माझी मशीद पुन्हा हवी आहे’, अशी मागणी केली आहे. ९ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने अयोध्या खटल्यावर निकाल दिला तेव्हाही ओवेसी यांनी आपला आक्षेप नोंदवला होता. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाप्रमाणेच मीसुद्धा या निकालाशी सहमत नाही. सुप्रीम कोर्ट ‘सुप्रीम’ असले तरी कोर्टाकडूनही चूक होऊ शकते, असे विधान ओवेसी यांनी केले होते. ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांनाच ट्रस्ट बनवायला सांगून राम मंदिर उभारायला सांगण्यात आले आहे, असे नमूद करत जर आज मशीद उभी असती तर सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला असता?, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला होता.

आमचा भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आमच्या हक्काची लढाई लढत होतो. आम्हाला ५ एकर जमिनीचे दान कुणी देण्याची गरज नाही. मुसलमान गरीब असला तरी मशिदीसाठी जमीन घेण्यास व पैसा उभा करण्यास तो सक्षम आहे, असेही ओवेसी म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या जमीन वादावर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने ऐतिहासिक निकाल देत अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा व मशिदीसाठी अन्यत्र ५ एकर जागा देण्याचा आदेश दिला असताना त्यावर एमआयएम प्रमुख, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेप घेतला आहे.

दरम्यान एकीकडे ओवेसी अयोध्या निकालावर आक्षेप घेत असताना त्यांच्याविरुद्ध बिहारमधील सारण जिल्ह्यातील एका न्यायालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष अभिमन्यूकुमार सिंह यांनी ही तक्रार केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरुद्ध टिपण्णी करून ओवेसी न्यायालयाचा अवमान करत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध बोलणं हा देशद्रोह ठरतो. ओवेसींच्या विधानांनी हिंदूंच्या भावनाही दुखावल्या जात आहेत, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. या तक्रार अर्जावर ४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!