Mumbai : केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईच्या  केईएम रुग्णालयात २९ वर्षीय डॉक्टरनं आत्महत्या केल्यामुळे  वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नायर रुग्णालयातील डॉ . पायल ताडवीच्या आत्महत्येचे prakarn ताजे असतानाच हि घटना घडली आहे. भोईवाडा पोलीस आधी तपास करीत आहेत.

Advertisements

प्रणय जयस्वाल असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. विषारी इंजेक्शन घेऊन या डॉक्टरनं स्वत:ला संपवलं. घटनास्थळी कुठलीही सुसाइड नोट मिळालेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

Advertisements
Advertisements

डॉ. प्रणय जयस्वाल मूळचे अमरावतीचे असून त्यांनी केईएम हॉस्पिटलमधून डिग्री परिक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांना सुवर्ण पदक मिळाले होते. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान भोईवाडा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आपलं सरकार