Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून किमान सामान कार्यक्रमाचा मसुदा तयार , सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा

Spread the love

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार केला असून काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुखांना हा मसुदा पाठविण्यात आला आहे. य मसुद्याला त्यांच्याकडून मान्यता मिळताच राज्यातील सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होईल अशी माहिती या तिन्हीही पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्हीही पक्षाच्या प्रतिनिधींनी राज्यातील नवे सरकार यांचा किमान सामान कार्यक्रम काय असेल या मुद्दयांवर दोन दिवस चर्चा करून आज त्यावर त्यावर अखेरचा हात फिरवून अंतिम मंजुरीसाठी हा मसुदा आपापल्या नेत्यांकडे पाठविल्याचे सांगितले.  हा मसुदा तयार करताना कोणतीही अडचण आली नसल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यांना दिली. आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मसुदा पाठवला जाईल. त्यांनी काही बदल सुचवल्यास बदल केले जातील किंवा त्यांनी या मसुद्याला तात्काळ मंजुरी दिल्यास राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन केली जाईल. राज्यात लवकरात लवकर आघाडीचं सरकार स्थापन करण्याची जनतेची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

जोपर्यंत वरिष्ठ नेत्यांची या मसुद्याला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत मसुद्यातील तपशील उघड करता येणार नाही. असे तिन्हीही पक्षांचे नेते म्हणाले.  या संयुक्त बैठकीला शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते या बैठकीला आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

दरम्यान राज्यातील आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झालं आहे. काँग्रेसची मुख्यमंत्रिपदाची मागणी ही निव्वळ अफवा असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. तर शिवसेना एनडीएतून बाहेर पडली आहे. त्यांनी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे, असं राष्ट्रवादीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची मागणी केलेली नाही. त्याबद्दल आमची आमच्या हायकमांडशी चर्चा झालेली नाही. काँग्रेसला मुख्यमंत्रिपद हवंय ही निव्वळ अफवा आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच सत्तावाटपाचं ठरणार आहे, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

‘मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसला सत्तेत यायचंच नाही, तर मागण्या कुठून समोर यायला लागल्या? मला नाही वाटत. त्यांना तर बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे, आमची इच्छा आहे की त्यांनी सत्तेत यावं. पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. येत्या दिवसात कोणताही वाद होणार नाही. आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. मलिक यांच्या वक्तव्यामुळे राज्यात शिवसेनेचा पाच वर्षासाठी मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याचंही स्पष्ट झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!