Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : राम माधव यांनी स्पष्ट शब्दात दिले महायुतीचा ” पोपट मेल्या”चे संकेत , एनडीएतून सेनेला बाहेरचा रस्ता, “संजय राऊत जोसेफ गोबेल्स “

Spread the love

भाजप-शिवसेना युती तुटल्याची अधिकृत घोषणा फक्त बाकी असली तरी सेना -भाजप महायुतीचा पोपट मेला कि नाही याचे उत्तर भाजपनेते राम माधव यांनी दिले असून त्यांच्या या वक्तव्यानुसार  शिवसेनेला एनडीए मधून बाहेरचा रास्ता दाखविण्यात आल्याचे संकेत देण्यात आले आहेत . भाजप नेते राम माधव यांनी  जोरदार शब्दांत शिवसेनेवर हल्ला चढवत  शिवसेनेला भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत स्थान मिळेल, ही शक्यता मावळल्यात जमा असल्याचे सांगितले. तर भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवणारे संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘जोसेफ गोबेल्स’ असल्याचे राम माधव म्हटले आहे.

राम माधव यांच्या या निवेदनामुळे हिंदुत्वाच्या समान धाग्यावर देशात सर्वाधिक काळ टिकलेली भाजप-शिवसेना युती आता कायमची तुटली, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजप नेतृत्वावर खोटारडेपणाचा थेट आरोप करत शिवसेनेने दंड थोपटून  खोटं बोलणाऱ्यांशी मैत्री ठेवायची नाही, असा शिवसेनेचा पवित्रा आहे. त्यातूनच कालपर्यंतचे हे दोन्ही मित्र आज एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असून राज्यातील भाजप नेतृत्वानंतर आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही शिवसेनेवर तोफ डागायला सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील स्थितीवर बुधवारी प्रथमच प्रतिक्रिया देत राष्ट्रपती राजवटीला शिवसेनेलाच जबाबदार धरले. महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ शकली नाही त्याला शिवसेनेचा हट्टीपणा कारणीभूत आहे, असा आरोप शहा यांनी केला. त्यानंतर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते राम माधव यांनीही शिवसेनेवर कडक शब्दात टीका केली.

रॅम माधव म्हणाले कि , शिवसेनेला भविष्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाण्याची शक्यता आता फारच कमी वाटते, असे नमूद करत राम माधव यांनी शिवसेनेसाठी एनडीएचे दरवाजे भाजपकडून कायमचे बंद झालेत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. राम माधव यांनी संजय राऊत यांच्यावरही तोफ डागली. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे ‘जोसेफ गोबेल्स’ आहेत असे नमूद करत एकप्रकारे उद्धव यांची तुलना माधव यांनी हिटलरशी केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!