Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : शिवसेनेच्या पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद चालूच, सर्व आमदार आज जयपूरहून मुंबईकडे रवाना

Spread the love

महाराष्ट्राच्या नव्या समीकरणात सहभागी व्हायचे कि नाही यावर अजूनही काँग्रेस पक्षात मतभेद चालूच आहेत . यापैकी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने  सरकारमध्ये सहभागी व्हावे या मतावर पक्षाचे महाराष्ट्रातील बहुतांश नेते ठाम आहेत. तर पक्षाच्या काही जेष्ठ नर्त्यांनी अशा सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे या समीकरणात काँग्रेस अपयशी ठरला तर, महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रतिमेवर प्रतिकूल परिणाम होईल असे काही नेत्यांनी सोनिया गांधी यांना कळविले आहे.  दरम्यान काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोमवारी प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. अस्तित्वाच्या लढाईत सरकारमध्ये सहभागी होणे पक्षाच्या हिताचं आहे, असं मतही या नेत्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार जयपूरकडून मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत.

सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील आदी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सुचविले आहे. निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वितुष्टानंतर चालून आलेली संधी कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असे त्यांचे मत आहे.

विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार सरकारमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत, असे  या नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधींना सांगितल्यानंतर स्वतः सोनिया गांधी यांनी प्रत्येक आमदारांशी बोलून त्यांच्याशी थेट चर्चा केली. दरम्यान या नेत्यांचे म्हणणे असे आहे कि , स्वच्छ प्रतिमा आणि स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असं या आमदारांचं म्हणणं आहे.  निवडून आल्यानं काही आमदार सत्तेसाठी आक्रमक झाले आहेत, त्यांच्या  दुसरीकडे आमदार फुटू शकतात या भीतीनं त्यांना जयपूरमध्ये हलवण्यात आले आहे. त्यावर जास्त दिवस ते संयम ठेवू शकत नाहीत आणि भाजपकडून आमदार फोडले जाण्याची भीती कायम राहील, ही बाबही त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिली.

शिवसेनेसोबत जाण्यास महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते उत्सुक असले तरी, अन्य राज्यांतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्याला विरोध आहे. शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयाला त्यांचा विरोध आहे. त्यात अँटनी, मुकुल वासनिक आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचा समावेश आहे. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी विचारणीच्या पक्षासोबत तडजोड केल्यास त्याचा फटका काँग्रेसला इतर राज्यांत बसू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!