Aurangabad : दुचाकीच्या डिक्कीतून दिड लाख रूपये लांबविले

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवून महावितरण कार्यालयात विजेचे बिल भरण्यासाठी गेलेल्या अनिल वामन आवळे (वय ४७, रा.बजाजनगर) यांचे १ लाख ५० हजार रूपये चोरट्यांनी लांबविले. ही घटना बुधवारी (दि.१३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महावितरणच्या ऑफीसजवळ घडली.

Advertisements

अनिल आवळे हे युनायटेड ब्रेव्हरीज या कंपनीत मशिन ऑपरेटर असून त्यांनी घर बांधण्यासाठी कॉसमस बँकेकडून कर्ज घेतले आहे. बांधकामासाठी १ लाख ५० हजार रूपये आवळे यांनी बँकेतून बुधवारी काढले होते. बँकेतून काढलेले पैसे दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीआर-४२२५) च्या दुचाकीत ठेवून ते विजेचे बिल भरण्यासाठी गेले होते. अनिल आवळे हे बिल भरून परत येईपर्यंत चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून पैसे लांबविले. याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड करीत आहेत.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार