औरंगाबाद : राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत रिद्धी, सिद्धीने गाजवली स्पर्धा , महाराष्ट्र संघाने जिंकले सुवर्णपद

Spread the love

औरंगाबाद : राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना औरंगाबादच्या रिद्धी हत्तेकर व सिद्धी हत्तेकर यांनी पदके जिंकून स्पर्धा गाजवली. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्टिस्टिक प्रकारात महाराष्ट्र संघाने १९६.९ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. या संघात रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर, सलोनी दादरकर, आभा परब, इशिता रेवाळे, मानसी देशमुख, सानिका अंतरडे यांचा समावेश आहे. १८८ गुणांसह उत्तर प्रदेश संघाने रौप्यपदक तर दिल्लीने १८४ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

वैयक्तिक साधन प्रकारात ऑलराऊंडमध्ये रिद्धी हत्तेकरने ४१.४० गुणांसह सुवर्णपदक पटाकावले. सिद्धी हत्तेकरने ४०.६० गुण घेत रौप्यपदकाची कमाई केली. अनन्या अग्रवालने कांस्यपदक जिंकले. फ्लोअर एक्सरसाइज साधन प्रकारात यशस्विता रावतने सुवर्णपदक जिंकले. रिद्धी हत्तेकरने ११.३५ गुण घेत रौप्यपदक पटाकावले. इशिता रेवाळेने कांस्यपदक संपादन केले. अनइव्हन बार प्रकारात सिद्धी हत्तेकरने ८.८ गुण घेत सुवर्णपदक जिंकले. परिधी जैनने रौप्यपदक मिळवले. अनन्या अग्रवालने कांस्यपदक पटाकावले. वॉल्टिंग प्रकारात प्रियांका दासगुप्ताने सुवर्णपदक पटाकावले. सलोनी दादरकरने रौप्य तर इशिता रेवाळे कांस्यपदकाची कमाई केली.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात आर्टिस्टिक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ३०९.९ गुण घेत सर्वसाधारण जेतेपद मिळवले. या संघात आर्यन दवंडे, मानस मानकावले, ओमकार धनावडे, मेघ रॉय, आर्यन नाहते, आयुष खामकर, हेरंब चव्हाण यांचा समावेश आहे.

१४ वर्षांखालील गटात रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत संयुक्त काळे, किमया कारले, परिणा मदनपौत्र, रिया खिल्लारे, मुस्कान राणा, स्पृहा साहू, स्वरा घोगळे, गुरसिरात कौर यांनी पदकांची कमाई केली.
या खेळाडूंना रामकृष्ण लोखंडे, संजय गाढवे यांचे मार्गदर्शन लाभले. संघासमवेत संतोष अवचार, सदानंद सवळे, आनंद थोरात, सिद्धार्थ कदम, तनुजा गाढवे, सचिन मांडवकर, संजोग ढोले, राजेश शिर्के, महेंद्र बाभुळकर, दिनेश जायभाये हे होते. या कामगिरीबद्दल औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक ऊर्मिला मोराळे, साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, लता लोंढे यांनी पदकविजेत्यांचे अभिनंदन केले.

आपलं सरकार