Aurangabad : विक्री केलेली जमीन पुन्हा विकली; व्यापार्‍याला ११ लाखांचा गंडा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : विक्री केलेली जमीन आपली असल्याची भासवूत ती पुन्हा एका व्यापार्‍याला विक्री करुन व्यापार्‍याची ११ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. मोहम्मद अब्दुल समीर अब्दुल साजीद व एजाज अली जैदी, दोघेही राहणार चेलीपुरा अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अब्दुल समीर याने त्याच्या मालकीची मौजे मिटमिटा येथील गट नं. २४ मधील जमीन २०१० मध्ये रिधिसिद्धी कोटेक्स प्रा.लि. यांना विक्री केली होती. असे असतांना देखील आरोपींनी सदरील १ हेक्टर १२ आर. जमीन स्वत: च्या मालकीची असल्याचे भासवत १८ ऑक्टोबर २०१८ रोजी व्यपारी प्रफुल्ल ब्रमवा (रा. नुतन कॉलनी) यांना विक्री केली. या जमीनीपोटी ब्रमवा यांनी आरोपींना अंजठा अर्बन को. ऑ. बँकेचा ११ लाखांचा धनादेश दिला.
मात्र सदरील जमीन आरोपींनी पूर्वीच कोणाला तरी विक्री केल्याचे ब्रमवा यांच्या निदर्शनास आले, त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षता येताच ब्रमवा यांनी आरोपी अब्दुल समीर यास दिलेले पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी ब्रमवा यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ब्रमवा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फसवणूक करणार्‍या दोघाविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक ठोकळ करीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार