Aurangabad : रस्त्यावर फेकलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाचे मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके, निर्दयी मातेविरुद्ध गुन्हा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : नुकत्याच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक रस्त्यावर फेकण्यात आल्याची घटना बुधवारी (दि.१३) सकाळी मिसारवाडी भागात उघडकीस आली. रस्त्यावर फेकण्यात आलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाचे लचके मोकाट कुत्र्यांनी तोडले असल्याची माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.

Advertisements

मिसारवाडी भागातील काही मोकाट कुत्री अर्भकाचे अवशेष तोंडात घेवून जात असल्याचा प्रकार एका महिलेच्या लक्षात आला. त्या महिलेने या घटनेची माहिती आजूबाजूच्या रहिवाश्यांना दिली. महिलेने व सोबतच्या नागरीकांनी पुढे जावून बघीतले असता एक अर्भक रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे त्यांना दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली, घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत मोकाट कुत्र्यांनी अर्भकाचे हाता-पायाचे लचके तोडले होते. कुत्र्यांनी लचके तोडल्यामुळे अर्भकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठ घाटी रुग्णालयात हलविले.

Advertisements
Advertisements

याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात स्त्री जातीचे अर्भक टाकून देणार्‍या निर्दयी मातेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.

आपलं सरकार