Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : Time Out : अद्याप कोणाचेही सरकार नाही , शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचा कोणताही निर्णय नाही !

Spread the love

आधी भाजप नंतर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी यांना राजपालांनी निमंत्रण देऊनही नियोजित वेळेत  कुठलेही सरकार स्थापन न झाल्यामुळे याचा अंदाज राज्यपालांना आल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचे वृत्त आहे . दरम्यान भाजप ला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी औट घटकेला शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गेली खरी पण या दोन्हीही पक्षांचा कुठलाही निर्णय न झाल्याने महाराष्ट्रात कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकले नाही हि या क्षणाची मोठी बातमी आहे .

या पार्श्वभूमीवर काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केले कि , शिवसेनेने आम्हाला कालच संपर्क साधला आहे. त्यामुळे आम्ही आज मुंबईत आलो. मात्र शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आधी दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा होईल. किमान समान कार्यक्रम ठरेल, त्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ.

दरम्यान शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा आघाडीचा कोणताही निर्णय न घेतल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यात नवं सरकार येण्यासाठी अजून काही दिवस जाणार असल्याचं सांगण्यात येतं.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने आम्हाला पहिल्यांदाच पाठिंबा मिळण्यासंदर्भात अधिकृत संपर्क साधला. दोन्ही पक्ष यावर विचार करुन योग्य तो निर्णय घेऊ असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तर भाजपा सरकार हे मनमानी करणारं सरकार आहे अशी टीका अहमद पटेल यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली. राज्यपालांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं मात्र काँग्रेसला दिलं नाही यावरही अहमद पटेल यांनी टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी काल पहिल्यांदाच सोनिया गांधी यांना फोन करुन सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मागितला. पाठिंब्यासंदर्भात आज आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. शरद पवार यांच्याशी आम्ही बोललो. आता याबाबत काय तो निर्णय घेऊ असं अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं. काल पहिल्यांदाच उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले असं शरद पवार यांनी म्हटलं. काही मुद्दे आमच्यातच स्पष्ट व्हायचे आहेत ते झाले की आम्ही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ असंही अहमद पटेल यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!