Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Live :  सत्ता संघर्षाची आज अखेर , राज्यात राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांनी केली केंद्राकडे शिफारस…शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

Spread the love

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर शिवसेनेने लगेचच आपणास सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगत राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.शिवसेनेच्या वतीने अॅड. सुनील फर्नांडिस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्रात राजकारणाचा खेळ चालू असून एक बातमी येऊन ती पब्लिश होत नाही तोच दुसरी बातमी येत आहे . आता हाती आलेल्या बातमीनुसार भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही राज्यात सत्तेचा दावा करण्यात अपयश आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी तसं पत्रंच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलं आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची घोषणा केली जाऊ शकते

दरम्यान थोड्याच वेळापुरवु मात्र राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस  केली नसल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले होते .

सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी आज सकाळी एकमेकांशी फोनवरून संवाद साधला. अहमद पटेल, मी आणि खरगे मुंबईत पवारांशी पुढील चर्चा करणार : काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाळ

काँग्रेस नेते शरद पवार यांना सायंकाळी ५ वाजता भेटणार : मलिक

तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापणे अशक्य, असे राष्ट्रवादीचे स्पष्ट मत : नवाब मलिक

दिल्लीचे काँग्रेसचे नेते अहमद पटेल, खरगे आणि वेणुगोपाल शरद पवारांना मुंबईत येऊन भेटणार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामार्फत एकत्रित निर्णय घेतला जाईल – नवाब मलिक, राष्ट्रवादी

दरम्यान राज्यातील सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरीकडं राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. केंद्रीयमंत्री मंडळाची बैठक सुरू असून, त्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. जर राष्ट्रपती राजवट लागल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रपती राजवटीला आव्हान दिल्यानंतर बाजू मांडण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांच्याशी संपर्क सुरू केला आहे.

दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी ब्राझिलला जाणार आहेत. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ निर्माण झाला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस जर रात्री साडेआठ पर्यंत सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करु शकली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं स्पष्ट होतं आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!