Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Politics | Live News Updates : शिवसेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळूनच बनवणार नवे सरकार , शरद पवार , उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात

Spread the love

बाहेरून कि सरकारमध्ये राहून काँग्रेस उद्या ठरवणार.

शिवसेना -काँग्रेस -राष्ट्रवादी मिळूनच आज ठरल्याप्रमाणे सरकार स्थापन करणार .

शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन; शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याची दर्शवली तयारी

मातोश्री बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या सकाळी १० वाजता मुंबईत बैठक

राज्यातील घडामोडीनंतर उद्या सकाळी १० वाजता काँग्रेसची दिल्लीत बैठक

राज्यातील घडामोडींनंतर भाजपचा वेट अँण्ड वॉचचा निर्णयः सुधीर मुनगंटीवार

भाजपनंतर शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेला निमंत्रण दिले होते. मात्र, मुदत संपल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांकडून निमंत्रणः नवाब मलिक

राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अजित पवार राजभवनाकडे रवाना

रात्री साडे आठ वाजता राज्यपालांकडून निरोपः अजित पवार

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी २४ तासांची मुदत

राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांकडून निमंत्रण: अजित पवार यांचे ट्विट

शरद पवार यांच्याशी चर्चा करून सोनिया गांधी पुढील रणनीति ठरवणार; काँग्रेस नेते राजीव सातव यांची माहिती

महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने; राज्यपालांनी शिवसेनेला वाढीव वेळ नाकारली

राज्यपालांनी वाढीव वेळ नाकारली. मात्र, शिवसेनेचा दावा कायम राहणारः आदित्य ठाकरे

शिवसेनेने सत्तेचा दावा केला. मात्र, अन्य पक्षांच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहेः आदित्य ठाकरे

सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी शिवसेनेला दिलेली मुदत संपली

काँग्रेसचे पत्रक; शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत उल्लेख नाही, राष्ट्रवादीशी करणार चर्चा

काँग्रेस पाठिंब्याचे पत्र अद्याप न मिळाल्याची माहिती

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती

एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य शिवसेना नेते राजभवनात दाखल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेण्यासाठी रवाना

उद्धव ठाकरे , शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरचर्चा झाल्याची माहिती. म्हणून शिवसेना वेळेच्या पूर्वीच राज्यपालांच्या भेटीला जात असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेला काँग्रेसचा तत्वतः पाठिंबा , राज्यपालांना सरकार बनवीत असल्याचे पात्र देण्याची सूचना. पाठिंबा आतून कि ते बाहेरून हे नंतर ठरविण्याचा संदेश.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दीड तासांपासून बैठक

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पत्र तयार

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधी थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

सोनिया करताहेत प्रत्येक आमदारांशी चर्चा , जाणून घेत आहेत मत

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचे वृत्त असून लवकरच काँग्रेस आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भातील राष्ट्रवादी थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार

भाजपने सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त करताच भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांनी सेनेकडे धाव घेतली आहे.

शिवसेना नेते ५.३० वाजता राज्यपालांची भेट घेणार

दिल्लीत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक; अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, राजीव सातव, मुकुल वासनिक यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित

काॅंग्रेसनेते अहमद पटेल आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर, आणि अनिल देसाई यांची बैठक सुरु

महाराष्ट्रातील ७ प्रमुख नेत्यांशी सोनिया गांधीची चर्चा आणि या संवादाची शक्यता.
१. सुशीलकुमार शिंदे : युती नको.
२. बाळासाहेब थोरात : मॅडम देतील तो आदेश
३. अशोक चव्हाण : : मॅडम देतील तो आदेश.
४. पृथ्वीराज चव्हाण : युती नको.
५. विजय वडेट्टीवार : : मॅडम देतील तो आदेश.
६. मल्लिकार्जुन खरगे : : मॅडम देतील तो आदेश.
अंतीम निर्णय : सोनिया गांधी आणि CWC

सोनिया गांधी यांचे मन वळविण्याचे राज्यातील नेत्यांचे प्रयत्न

काॅंग्रेसची काही अटी-शर्तीवर नव्या सरकारला पाठिंबा देण्याची तयारी, पण आतून कि बाहेरुन हा निर्णय होणे बाकी.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक संपली असून या बैठकीत ठाकरे यांनी आपला अधिकृत प्रस्ताव शरद पवार यांना दिला आहे. या दोन नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली असून काॅंग्रेसचा निर्णय झाल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका उघड करणार आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू

शिवसेना दुपारी राज्यपालांना भेटणार , उद्धव आणि आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला

राज्यपाल कोश्यारी यांनी काल शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर सस्ता स्थापनेच्या हालचाली वाढली आहेत. दरम्यान शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला आहे, तर आज दिवसभरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसना आणि भाजपच्या बैठकाही होत आहेत.

उद्धव, आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले असून राष्ट्रवादीने मात्र कॉंग्रेसचा निर्णय येईपर्यंत कुठलाही निर्णय जाहीर न करण्याचे ठरविले असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आ. नवाब मलिक यांनी दिली आहे.

या क्षणापर्यंत तरी कुठलीही ठोस बातमी नसली तरी शिवसेना दुपारी अडीच वाजता राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत . सेनेला त्यांनी यादी देण्यास २४ तास तर भाजपला ७२ तास दिले होते त्यामुळे एक तर बहुमत सिद्ध करण्यासाठी आणि आमदारांच्या सह्या घेण्यासाठी वेळ वाढवून देण्याची त्यांची मागणी असेल किंवा आपल्याकडे असलेल्या आमदारांच्या सह्यांचे निवेदन टे राज्यपालांकडे सादर करतील असे सांगण्यात येत आहे .

त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा आपला निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज संध्याकाळी जाहीर करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे.

या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्यातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच काँग्रेस आपला निर्णय जाहीर करेल असे मल्लिकार्जुन यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसची राज्यातील वरिष्ठ नेत्यांची पुढील बैठक आज संध्याकाळी ४ वाजता होणार असून त्यानंतर काँग्रेस आपला निर्णय जाहीर करणार आहे. काँग्रेसचा हा निर्णय लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पत्रकार परिषद रद्द केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपला निर्णय लांबणीवर टाकला असून काँग्रेसने निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली भूमिका एकमताने जाहीर करेल,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!