Maharashta Politics : काँग्रेसचे शिवसेनेबरोबर जाणे आपत्तीजनक , विनाशक : संजय निरुपम

Spread the love

महाराष्ट्रात सत्तेच्या  नव्या समीकरणांची चर्चा सुरु असतानाच या समीकरणाला काँग्रेसमधूनच मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला आहे . मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी एका ट्विटद्वारे ‘शिवसेनेच्या सोबत जाणं ही काँग्रेस पक्षासाठी आपत्तीजनक ठरेल,’ असे म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शनिवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या आमंत्रणावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. तर, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काहीही झाले तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल अशी गर्जना पुन्हा केली आहे .  दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षानेही समांतर समीकरणाची जुळणी सुरू केली आहे.

आपलट ट्विटमध्ये संजय निरुपम यांनी म्हटले आहे कि , ‘सध्या राजकीय परिस्थितीत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार स्थापनं कठीण आहे. कारण, आमच्याकडे तेवढे आकडे नाहीत. बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर आम्हाला शिवसेनेची गरज लागेल. मात्र, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा विचार कोणत्याही परिस्थिती केला जाऊ नये. तसा काही निर्णय झालाच तर तो पक्षासाठी आपत्तीजनक ठरेल,’ असं निरुपम यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचंही असंच मत असल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.

आपलं सरकार