Aurangabad : जनावरे चोरून तस्करी करणारा गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : ग्रामीण भागातून जनावरे चोरून त्यांची तस्करी करणार्‍या विनोद भानुदास गायकवाड (वय २६, रा.वैतागवाडी-गोंदी, ता.अंबड,जि.जालना) याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गजाआड केले. विनोद गायकवाड याच्या ताब्यातून पोलिसांनी पैठण तालुक्यातील म्हारोळा येथून चोरलेले दोन बैल, एक कालवड, जनावरे चोरी करण्यासाठी वापरलेली पीकअप जीप असा एकूण ४ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, सहाय्यक फौजदार वसंत लटपटे, जमादार संजय काळे, श्रीमंत भालेराव, दिपेश नागझरे, राहुल पगारे, वाल्मीक निकम, संजय तांदळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या विनोद गायकवाड याला पुढील तपासासाठी बिडकीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी कळविले आहे.

Advertisements

आपलं सरकार